जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांगी बुद्रुक या ठिकाणी शिवजयंती उत्सव
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांगी बुद्रुक या ठिकाणी शिवजयंती उत्सव
आज दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांगी बुद्रुक या ठिकाणी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला त्यावेळी शालेय मुलांनी प्रभात फेरी काढून शिवगर्जना केली. त्यानंतर शाळेमध्ये शिवप्रतिमेचे पूजन अखिल भारतीय मानवाधिकार मिशन जिल्हा अध्यक्ष श्री धनंजय माने यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले यावेळी सरपंच ज्ञानेश्वर बिडगर,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल कांबळे,उपाध्यक्ष गोकुळ बर्डे, सदस्य स्वप्निल खेमनर पत्रकार श्री. कानिफनाथ पवार, नवनाथ माळी आशा सेविका अनिता आव्हाड उपस्थित होते यावेळी प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री मते सर यांनी केले सदर कार्यक्रमासाठी शाळेचे शिक्षक डुकरे सर श्री सोनकांबळे सर श्री बागुल सर व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
तसेच यावेळी ग्रामपंचायत वांगी बुद्रुक कार्यालयामध्येही शिवप्रतिमेचे पूजन करून शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी ग्रामसेवक बाचकर मॅडम पदाधिकारी म्हणून उपस्थित होत्या.