सात्विक दूध संकलन केंद्र तिळापुर येथे महाशिवरात्रीनिमित्त फराळ वाटप.

सात्विक दूध संकलन केंद्र तिळापुर येथे महाशिवरात्रीनिमित्त फराळ वाटप.
राहुरी तालुक्यातील तिळापुर येथे सालाबाद प्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह तसेच महाशिवरात्री या दिवशी लाखो भाविक भक्तांची रीग लागलेली असते मुळा प्रवरा नद्यांच्या पवित्र संगमावरती पंचक्रोशीचे आराध्य दैवत असलेल्या महादेवाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्तगणांना लेने को हरिनाम देणे को अन्नदान या युक्तीप्रमाणे सात्विक दूध संकलन केंद्र चेअरमन विलास गीते रुद्र न्यूज नेटवर्क चे सर्वेसर्वा संस्थापक संपादक नारायण चोरमले मच्छिंद्र थोरात कैलास तमनर सिद्धार्थ काकड यांनी देवदर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांना सकाळपासून फराळ वाटप चालू केले होते ह्या अनोख्या परंपरेला सुरुवात झाल्याने नागरिकांनी त्यांचे आभार मानले त्यावेळी माजी सरपंच विजय गरदरे कैलास तमनर दिलीप गरदरे बाळासाहेब सरोदे दत्तात्रय गरदरे कोळेकर राष्ट्रीय समाज पक्षाचे उपाध्यक्ष रवींद्र जाधव सिद्धार्थ काकड डॉक्टर अविनाश गरदरे हर्षल तमनर राहुल गीते प्रतीक तमनर आचारी सोमनाथ नवाळे आदींनी परिश्रम घेतले.