ग्रामस्थांच्या तक्रारीमुळे आमदार लहू कानडे यांनी घेतली टाकळीभान आरोग्य केंद्राची झडाडती.
ग्रामस्थांच्या तक्रारीमुळे आमदार लहू कानडे यांनी घेतली टाकळीभान आरोग्य केंद्राची झडाडती.
टाकळीभान प्रतिनिधी: टाकळीभान प्राथमिक आरोग्य केंद्रा बाबत ग्रामस्थांच्या वाढत्या तक्रारी मुळे आमदार लहू कानडे यांनी अचानकपणे प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आरोग्य केंद्राची पाहणी केली यावेळी आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी यांची जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी व विविध शासकीय पदावर राहिलेले आमदार लहू कानडे यांनी विचारलेल्या अभ्यासपूर्ण प्रश्नांना उत्तर देताना अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. त्यांच्या कामकाजात झालेल्या चुकांबद्दल आमदार कानडे यांनी अधिकारी व कर्मचारी यांना धारेवर धरले . व त्यांना कामकाजात सुधारणा करण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना केल्या. श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान मोठे गाव असून येथील प्राथमिक आरोग्य केंद्र याच्या अंतर्गत आसपासच्या सहा-सात गावांचा समावेश होतो. तसेच नेवासा फाटा ते बाभळेश्वर फाटा यास जोडणारा महाराष्ट्र राज्य मार्ग क्रमांक 44 या गाव मधूनच जात असल्याने मोठी रहदारी या गावाजवळ असते व गावाची लोकसंख्या ही 27 ते 30 हजाराच्या आसपास आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या व आसपासच्या गावच्या लोकांच्या आरोग्याची जबाबदारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर येते. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या तक्रारीबाबत वृत्तपत्रांमध्ये बातम्या छापून आल्या असता टाकळीभान येथे विकास कामाच्या उद्घाटन च्या निमित्ताने आमदार लहू कानडे टाकळीभानला आले असता त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळीभान येथे अचानकपणे भेट देऊन कामकाजाची व प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली. या ठिकाणी आरोग्य केंद्राचे कर्मचारी वेळेवर येत नाहीत ,त्याचप्रमाणे औषधांचा स्टॉक उपलब्ध असत नाही, परिसरात अस्वच्छता असते.अशा ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या. त्या संदर्भात आमदार लहू कानडे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची वैद्यकीय अधिकारी व उपवैद्यकीय अधिकारी, व सर्व कर्मचारी यांची झडाडती घेतली तसेच त्यांच्या कडे कामासंदर्भात चौकशी करून येथील स्टॉक रजिस्टर याची पाहणी केली. व त्यांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या यामध्ये. हे मोठे गाव असून आसपासच्या सर्व गोरगरीब गरजू सर्वसामान्य गावातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी या दवाखान्यावर आहे. त्यामुळे आपण सर्वांनी जबाबदारीने वागावे असे सुनावले. सध्या बदलत्या वातावरणामुळे व्हायरल इन्फेक्शन मुळे नागरिक आजारी पडत असून आपण त्यांना या ठिकाणी 24 तास सेवा द्यावी. दोन्ही प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी या ठिकाणी पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी यांनी सेवेसाठी उपलब्ध राहावे त्यासाठी आठवड्यातील चार -चार दिवस शिफ्ट वाटून घ्यावी. त्याचप्रमाणे स्टॉकचे रेकॉर्ड वेळेवर मेंटेन ठेवावे लोकांना सर्व प्रकारचे औषधे वेळेवर उपलब्ध करून द्यावेत. येथील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन परिसर स्वच्छ ठेवावा.अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. व आपल्या कामकाजामध्ये व सेवे मध्ये बदल न झाल्यास पर्यायी निर्णय घेऊ अशी तंबीही आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली. याप्रसंगी अशोक नाना कानडे, ज्ञानेश्वर मुरकुटे, अरुण पाटील नाईक,राजेंद्र कोकणे, विष्णुपंत खंडागळे,उपसरपंच कान्हा खंडागळे, प्रा. जयकर मगर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी, स्टाफ व ग्रामस्थ उपस्थित होते.
– रात्री डॉक्टर हजर नसतात, हेडकॉटर सोडून श्रीरामपूरला राहतात,