न्यायमुर्ती त्याला सर सर म्हणत होते, तो पाचवी पास तरी आहे का? याद राख माझ्या शेपटी वर परत पाय द्यायचा प्रयत्न करू नकोस – छगन भुजबळ
न्यायमुर्ती त्याला सर सर म्हणत होते, तो पाचवी पास तरी आहे का? याद राख माझ्या शेपटी वर परत पाय द्यायचा प्रयत्न करू नकोस – छगन भुजबळ
याद राख, माझ्या शेपटीवर पाय द्यायचा प्रयत्न करू नकोस असा थेट इशारा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांना दिलं आहे.
छगन भुजबळांनी मराठा आरक्षण आंदोलनवरून मनोज जरांगे यांच्यावर चांगलीच टीका केली आहे. जालन्यामधील आंबड या ठिकाणी आज ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी मनोज जरांगे यांना पहाटे आणून आंदोलनाला बसवल्याचा आरोपही त्यांनी केला.
छगन भुजबळ म्हणाले की, न्यायमुर्ती त्याला सर सर म्हणत होते, तो पाचवी पास तरी आहे का? याद राख माझ्या शेपटी वर परत पाय द्यायचा प्रयत्न करू नकोस. हा पहिला आणि शेवटचा मेळावा नाही. प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात मिळावे झाले पाहिजेत. ओबीसींची संख्या जास्त असून महाराष्ट्रातही जातीय जनगणना ताबडतोब झाली पाहिजे.
बीडमध्ये ,प्रकाश सोळुंकेचे घर जाळले. त्यामागे एक ग्रुप नव्हता. कोड नंबर देण्यात आले होते. त्या ठिकाणी कोयते, चॉपर सापडले, पेट्रोल बॉंब सापडले. कोड नंबर दिले होते-1 नंबर प्रकाश सोळुंके आणि 12 नंबर राऊत हॉटेल असे नंबर दिले. हॉटेल 12-15km वर होत त्याचा काय दोष होता, चो obc होता म्हणून हे केलं. राखरांगोळी शब्द म्हणजे काय मी त्या दिवशी बीडमध्ये पाहिले. संदीप क्षीरसागर यांचे घर जाळले, त्यानंतर राऊतचे हॉटेल जाळले. जयदत्त क्षीरसागर, संदीप सागर यांच्या घरात पेट्रोल बॉंब टाकले, त्यांची लेकरं बाळ पण घरात होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुम्हाला दुसऱ्याची घरं जाळायलाच सांगितली?
पोलिसांचा लाठीचार्ज सगळ्यांनी पाहिला, पण 70 पोलिस रुग्णालयात जखमी झाले, ते कोणी पाहिले नाही. पोलीस याला उठवायला गेले तेव्हा त्यावेळी जरांगे यांनी सर्व तयारी केली होती, पोलिसांवर दगडाचा मारा सुरु झाला. 70 पोलीस पाय घसरून पडले का त्यांना कोणी मारले? छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांच्या सुनेला सुद्धा आई म्हणून परत पाठवलं, त्या महिला पोलिसांवर दगडफेक केली. लाठीचार्ज झाल्यावर हे सरदार घरात जाऊन बसले. राज्यापुढे खरं चित्र आले नाही. राज्याच्या गृहमंत्र्यांनीच माफी मागितली आणि गुन्हे मागे घेण्याचं जाहीर केलं. त्यामुळे पोलिसांचे मनोबल खचलं.