जिल्हा परिषद आदर्श शाळा धानोरे येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा जल्लोष*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*जिल्हा परिषद आदर्श शाळा धानोरे येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा जल्लोष*
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त आज सोमवार दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7:30 वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर श्री खंडू गावडे मा.चेअरमन यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
अमृत महोत्सवाचा मुख्य कार्यक्रम जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा धानोरे शाळेच्या प्रांगणात सरपंच श्री अनिलशेठ गावडे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला.सर्व आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, आजी माजी चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक शाळा व्यवस्थापन समितीचे आजी माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य शिक्षक पालक समिती, मातापालक समिती ग्रामस्थ पालक मोठ्या उत्साहाने कार्यक्रमासाठी जमले होते. या ठिकाणी धानोरे गावचे आद्य नागरिक सरपंच श्री अनिलशेठ गावडे यांचे हस्ते सकाळी ठीक 8 : 00 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त विद्यार्थ्यांनी काढलेल्या रांगोळी प्रदर्शनाचे उदघाटन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. शाळेच्या वतीने श्रीम. दिपाली घेनंद / पऱ्हाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. करोनाकाळात झालेल्या पाचवी आठवी शिष्यवृत्ती परीक्षा व राष्ट्रीय दुर्बल शिष्यवृत्ती परीक्षा, मंथन प्रज्ञाशोध परीक्षा, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा तसेच इंग्रजी अध्ययन समृद्धी स्पर्धामध्ये उज्वल यश संपादन केलेल्या व जिल्हा परिषद पुणे च्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धामध्ये जिल्हा व तालुका पातळीवर उज्वल यश संपादन केलेल्या विध्यार्थ्यांचा व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा गुणगौरव समारंभ पार पडला. विध्यार्थ्यांना व मार्गदर्शक शिक्षकांना सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचे हस्ते गौरविण्यात आले. स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रतिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढयाविषयी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी अमृत महॊत्सवानिमित्त विविध वेशभुषा केल्या होत्या त्या साकारताना अंगावर शहारे आणणाऱ्या वक्तीरेखा पाहून सर्व प्रेक्षक रोमांचित झाले होते. आपण भारतीय असल्याचा अभिमान प्रत्येक प्रेक्षकाला वाटत होता. त्यानंतर धानोरे गावच्या इतिहासात प्रथमच धानोरे शाळेतील विद्यार्थ्यांनी दिल्लीतील राजपथा प्रमाणे शाळेच्या प्रांगणात चित्ररथ सादर केले, त्यामधून भारतीय लोककला व संस्कृतीचे दर्शन पाहायला मिळाले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध रचना व प्रतिकृती सादर करत उपस्थितांना भारतीय स्वातंत्रलढा व भारतीय संस्कृती चे दर्शन घडविले. संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम.अनिता परदेशी यांनी केले. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम.सुनिता भातकांडे व सौ. रंजना सोनवणे यांनी केले उपस्थित सर्वांचे आभार सौ. मोहंमदी काझी यांनी मानले. ग्रामपंचायत धानोरे यांचे वतीने सर्व विद्यार्थी शिक्षकांना खाऊ म्हणून बिस्कीट पुढे वाटप करण्यात आले त्याबद्दल सरपंच उपसरपंच सर्व सदस्य व ग्रामसेवक यांचे हार्दिक आभार..!!! अशा प्रकारे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा मुख्य कार्यक्रम धानोरे शाळेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात साजरा झाला.
मुख्याध्यापक व शिक्षकवृंद जि. प. आदर्श प्राथमिक शाळा धानोरे, ता : खेड, पुणे.