व्यवस्थित असून कोस दूर असणाऱ्या उपेक्षित आणि वंचित घटकासोबत स्वतंत्र अमृत महोत्सव साजरा
व्यवस्थित असून कोस दूर असणाऱ्या उपेक्षित आणि वंचित घटकासोबत स्वतंत्र अमृत महोत्सव साजरा
टाकळीभान येथेव्यवस्थेपासून कोसो दूर असणाऱ्या उपेक्षित आणि वंचित घटकांसोबत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला
।।स्वातंत्र्याचं झालं काय ? अन् आमच्या हाती आलं काय ? स्वातंत्र्याचा सुर्य आमच्या झोपडीत कधी उगवलाच नाही..।।
टाकळीभानचे कर्तव्यदक्ष तलाठी श्री.अरुण हिवाळे साहेब यांच्या संकल्पनेतून ,प्रहार जनशक्ती पक्ष व भारतीय जनता पार्टी टाकळीभान यांच्या संयुक्त विद्यमाने…,
व्यवस्थेपासून कोसो दुर असणार्या उपेक्षित अन् वंचित घटकासोबत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला गेला.
या वंचितांच्या झोपड्यांवर डौलणारा तिरंगा भारतीय स्वातंत्र्याच्या जाज्वल्य इतिहासाची ,त्यागाची,बलिदानाची व स्वाभिमानाची साक्ष देतो.
आज यांच्या झोपड्यांवर तिरंगा लावून अल्पोपहार ( बुंदी लाडू व फरसान ) देण्यात आला.
याप्रसंगी तलाठी अरुण हिवाळे ,युवा नेते भाऊसाहेब पवार,नारायण काळे,नवाज शेख,सदामामा रणनवरे,भगवान पाडांगळे उपस्थित होते.