कर्मयोगी चषकाचा बहुमान पटकावीला कोपरगावच्या येसगाव संघाने
कर्मयोगी चषकाचा बहुमान पटकावीला कोपरगावच्या येसगाव संघाने
–रायझींग इलेव्हन क्रिकेट अकँडमीने आयोजित केलेल्या कर्मयोगी मुरलीधर खटोड चषकाचा बहुमान व रुपये २१ हजार रुपयाचे पारितोषिक कोपरगावच्या येसगाव संघाने मिळवीले रायझींग इलेव्हन क्रिकेट अकँडमीच्या वतीने बेलापूरात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेकरीता प्रथम क्रमांकाचे (रुपये२१००० )एकवीस हजार रुपयाचे पारितोषिक कै .मुरलीधर खटोड पतसंस्थेच्या वतीने ठेवण्यात आले होते. तर योगेश पाटील नाईक मित्रमंडळाच्या वतीने द्वितीय क्रमांकाचे (रुपये ११०००)अकरा हजार रुपयाचे तसेच तृतीय क्रमांकाचे (रुपये ७०००)सात हजार रुपयाचे पारितोषिक किरण औटी मित्र मंडळाच्या वतीने ठेवण्यात आले होते. उत्तेजनार्थ (रुपये ५००० )पाच हजार रुपयाचे पारितोषिक किरण गंगवाल व आनंद दायमा यांच्या वतीने ठेवण्यात आले होते. या स्पर्धेत एकुण सोळा संघांनी सहभाग नोंदवीला. बेलापूरचा डीटीडीसी व कोपरगावचा येसगाव संघ यांच्यात अतिम लढत झाली. येसगाव संघाने प्रथम फलंदाजी करत सहा षटकात ६४ धावा केल्या. परंतु डीटीडीसी संघाला ही धावसंख्या गाठता आली नाही. प्रथम क्रमांकाचे रुपये एकवीस हजाराचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक येसगाव संघाने मिळवीले तर बेलापूरच्या डीटीडीसी संघाने दुसऱ्या क्रमांकाचे रुपये अकरा हजार रुपयाचे पारितोषिक मिळवीले. पढेगाव संघाने तिसरा तर एसडी लाईव्ह बेलापुर या संघाला चौथे बक्षिस देण्यात आले. या वेळी अशा मैदानी खेळांच्या स्पर्धा वेळोवेळी भरविल्या जाव्यात जेणे करुन मोबाईल तसेच व्यसनाच्या अहारी गेलेली तरुण पिढी खेळाकडे तसेच व्यायामाकडे वळेल असे मत जेष्ठ पत्रकार देविदास देसाई यांनी व्यक्त केले. या वेळी खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड ,माजी सरपंच भरत साळूंके ,अजय डाकले, शिवसेना शहर प्रमुख अशोक पवार, अभिजित राका ,योगेश नाईक ,प्रसाद खरात, मुन्ना खरात ,गणेश मगर,जयेश अमोलीक , रफीक शेख , किरण भांड ,भूषण चंगेडीया, अँड. यशवंत नाईक आदिच्या उपस्थितीत बक्षिस वितरण संपन्न झाले या सर्व सामन्याचे फेसबुकवर लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते त्या करीता निखिल ढमाले व विनोद शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धा यशस्वी करणेसाठी रामभाऊ मगर ,सुनिल ढमाळे, फिरोज पठाण, किरण साळूंके, संकेत कुमावत, साई पवार, शकील शेख, सनी जगताप, प्रतिक कर्पे, जितेश साळूंके, ब्रिजेश कर्पे, अजय धनवटे आदिंनी विशेष प्रयत्न केले शाहरुख पठाण यांनी सर्व सामन्याचे सुंदर असे समालोचन केले होते.