शाळेला प्राधान्य देणारे व शिक्षणाचे महत्त्व जाणणारे सरपंच वांगी खु// गावाला लाभले.
शाळेला प्राधान्य देणारे व शिक्षणाचे महत्त्व जाणणारे सरपंच वांगी खु// गावाला लाभले.जि.प.सदस्य शरद नवले
जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांच्या जिल्हा परिषद जिल्हा नियोजन निधीतून शाळे साठी वर्ग खोली मंजूर. वांगी खुर्द मध्ये इयत्ता १ ली ते ५ वी पर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे त्यात वर्ग खोल्या फक्त दोन त्यातच शिक्षक अवघे तिन त्यामुळे १ ली ते ५वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलांना दोन खोल्या मध्ये कसे शिकवावे हा पेच शिक्षकांना पडला होता.परंतु या दोन खोल्यांमध्ये शिक्षण देत मुख्याध्यापक तांबे सर भोसले सर उंडे म्याडम यांनी मुलांना अप्रतिम शिक्षण देत पलक वर्गामध्ये अदराचे स्थान मिळविले आहे परंतु मुलांच्या आणखी उज्वल भविष्यासाठी शाळेसाठी एक खोली मंजूर ह्वावी म्हणून वांगी खुर्दचे कर्तुत्ववान विद्यमान युवा सरपंच काकासाहेब साळे यांंनी विनंती केली मुलांच्या भविष्याचा विचार करून सरपंच काकासाहेब साळे यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून आखिर जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांच्या निधीतून खोली मंजूर करून घेतली. जिल्हा परिषद शरद नवले यांच्या विकास निधीतून ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलल्याचे दिसून आले कोणत्याही मागणीला तत्पर प्राधान्य देऊन त्यांनी ग्रामीण भागात विकासाची गंगा आणल्याचे दिसून आले त्याचेच एक प्रचिती म्हणून वांगी खुर्द गावाला शिक्षणाचे महत्त्व देणाऱ्या सरपंचाच्या मागणीला वर्ग खोली मंजूर करून दि ५/९/२०२२ म्हणजे शिक्षक दिन याचे औचित्य साधून वर्ग खोली जागेचे उद्घाटन मा.पं.स. सभापती विद्यमान तालुका अध्यक्ष भाजपा दिपक आण्णा पटारे जि.प.सदस्य शरद नवले पं. स.उपसभापती बाळासाहेब तोरणे यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मा.सरपंच गिरीश येळे यांच्यासुचने वरून सरपंच काकासाहेब साळे यांनी भुषविले अनुमोदन उमेश गायकवाड यांनी दिले तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाश मोरे यांनी केले या कार्यक्रमा प्रसंगी वांगी बुद्रुक चे माजी सरपंच संजय भिसे, अखिल अखिल भारतीय मानवाधिकार मिशन जिल्हा अध्यक्ष धनंजय माने, उप सरपंच चिलीया जगताप, सोमनाथ पवार, भिमा बर्डे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कृष्णा पिसाळ, बाळासाहेब रोहकले, बबन आहेर, दत्तात्रय देवकर, ग्रामसेवक तगरे भाऊसाहेब, बाळासाहेब पवार व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते