अव्वल कारकुन श्रीमती मगरे व मंडलाधिकारी बोरुडे यांना पदोन्नती
अव्वल कारकुन श्रीमती मगरे व मंडलाधिकारी बोरुडे यांना पदोन्नती
–नाशिक विभागातील अव्वल कारकुन व मंडलाधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या नायब तहसीलदार (गट ब )पदावर पदोन्नती देण्यात आल्या असुन श्रीरामपुर पुरवठा विभागात अव्वल कारकुन म्हणून सेवा देणाऱ्या चारुशिला मगरे व बेलापुरचे मंडलाधिकारी चांगदेव बोरुडे यांना नायब तहसीलदार म्हणून बढती मिळाली आहे नाशिक महसुल विभागातील मंडलाधिकारी व अव्वल कारकुन या पदावरील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याचा निर्णय नाशिक विभागाचे आयुक्त यांचे अध्यक्षतेखाली पदोन्नती समीतीच्या बैठकीत केलेल्या शिफारशी नुसार पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला श्रीरामपुर तहसील कार्यालयात पुरवठा विभागात तीन वर्षापासून अव्वल कारकुन म्हणून उत्कृष्ट सेवा देणाऱ्या चारुशिला मगरे व बेलापुरचे मंडलाधिकारी चांगदेव बोरुडे यांचा पदोन्नती यादीत समावेश आहे चारुशिला मगरे यांची श्रीरामपुर तहसील कार्यालयातच संजय गांधी नायब तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली आहे तर मंडलाधिकारी चांगदेव बोरुडे यांची नेवासा निवासी नायब तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे श्रीमती मगरे व मंडलाधिकारी बोरुडे यांच्या पदोन्नतीबद्दल मा. जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे जेष्ठ पत्रकार देविदास देसाई चंद्रकांत झुरंगे बजरंग दरंदले भाऊसाहेब वाघमारे रज्जाक पठाण लहानु नागले दिलीप दायमा किशोर कदम आदिंनी अभिनंदन केले आहे