मयत नामदेव जाधव यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी रयत शेतकरी संघटनेचा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन यशस्वी– सुनील ठोसर
लेखी आश्वासनंतर आंदोलन मागे.
मयत नामदेव जाधव यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी रयत शेतकरी संघटनेचा हिंगणगाव नदीपात्रात जलसमाधी आंदोलन यशस्वी– सुनील ठोसर
लेखी आश्वासनंतर आंदोलन मागे
गेवराई तालुक्यातील मौजे हिंगणगाव येथील ऊस उत्पादक शेतकरी मयत नामदेव जाधव यांचा ऊस वेळेवर कारखाना नेला नसल्याने मयत नामदेव जाधव यांनी दि, ११ मे रोजी ऊस पेटवून ऊसाच्या फडातच लिबांच्या झाडाला आत्महत्या केली होती. तर या जाधव कुटुंबियांना न्याय देण्यासाठी रयत शेतकरी संघटना ठाम लढा देत असल्याचे दिसत आहे. रयत शेतकरी संघटनेचे संस्थापक मा. रविप्रकाश देशमुख यांनी वेळोवेळी सर्व शासकीय कार्यालयत जाऊन विविध मागणी केली आहे. तरी या मागण्या मान्य होईपर्यंत आमचा पाठपुरावा चालू राहिल असे आंदोलनस्थळी मा. रविप्रकाश देशमुख यांनी सांगितले आहे,
सविस्तर मागणी अशी की, मयत जाधव यांचा ऊस कारखानांनी नेला नाही म्हणून नामदेव जाधव यांनी आत्महत्या केली आहे. या प्रकरणी संबंधित खाजगी सावकार यांच्यावर कठोर कारवाई करणार असेही माननीय तहसीलदार खाडे साहेब यांनी सांगितले आणि या कुटुंबियांना १० लाखाची तात्काळ मदत मिळावी व नामदेव जाधव यांची पत्नी आरती नामदेव जाधव यांना शासकीय सेवेत समावेश करून घ्यावे आणि सदरील कुटुंबास घरकुल, सिंचन विहीर, निराधार योजना, आत्महत्या मदत, खाजगी सावकाराडून मानसिक त्रास झाल्यामुळे कायदेशीर कार्यवाही आदी सर्व मागण्या तत्काळ सर्व आधी मागण्या विशेष बाब म्हणून सर्व प्रस्ताव शासनाकडे पाठपुरावा सुरू असून तत्काळ मार्गी लावू उद्या माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी विशेष मीटिंग बोलावली आहे असे गेवराई तहसीलदार साहेब यांनी लेखी सांगून आजचे आंदोलन मार्गी लागले आहे. प्रशासनाच्या विनंतीला व सर्व पाठपुराव्याला लेखी स्वरूपात घेऊन सर्व विषय मार्गी लावू आमचा पाठपुरावा सर्व विभागांशी चालूच राहील असेही यावेळी शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर यांनी सांगितले.
आंदोलनस्थळी शासकीय अधिकारी व पोलीस स्टेशनचे आधिकारी उपस्थित होते. यावेळी कै. नामदेव जाधव यांचे कुटुंब रयत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख, राज्य संपर्क प्रमुख रामदास कोतवाल, पुणे युवक जिल्हा प्रमुख निलेश भगवान वारघडे , ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय हांबिर मामा, प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर, पत्रकार नवनाथ आडे, बाळराजे जाधव, पोलिस उपनिक्षक बोडखे साहेब, ग्रामविकास अधिकारी खंडागळे साहेब, महसूल अमलेकर साहेब, बीट अमलदार अशोकराव हंबर्डे सह पोलिस अधिकारी, सरपंच व गावातील शेतकरी उपस्थित होते