बेलापुर परिसरात बिबट्याचा वावर पिंजरा लावण्याची मागणी.

बेलापुर परिसरात बिबट्याचा वावर पिंजरा लावण्याची मागणी.
गेल्या काही दिवसापासून साई मंदिर बेलापुर येथे बिबट्याचे वास्तव्य असुन अनेकांना त्याचे दर्शन झालेले आहे .त्यामुळे अनुचित घटना घडण्याआगोदर वन विभागाने पिंजरा लावावा अशी मागणी बेलापुर ग्रामस्थांनी केली आहे . रात्रीच्या वेळेस हा बिबट्या साई मंदिराकडून रस्ता ओलांडून नाईक पाटील यांच्या शेताकडे जाताना अनेकांनी पाहीला आहे हा रस्ता सतत रहदारीचा असुन पहाटे व सायंकाळी अनेक नागरीक फिरण्यासाठी जात असतात ज्यांना बिबट्याचे दर्शन झाले त्यांनी तातडीने उपसरपंच अभिषेक खंडागळे यांना कळवीले उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी तातडीने या बाबत वन परिक्षेत्र अधीकारी कोपरगाव यांना कळविले त्यांनी लेखी अर्ज करणे बाबत सांगितले यापूर्वी मगणी करताच पिंजरा लावला जात असताना आता अर्ज देण्याचा नियम केव्हापासून झाला यांची विचारणा खंडागळे यांनी उपवन संरक्षक अधीकारी सुवर्णा माने यांच्याशीही चर्चा केली त्यांनी देखील अर्ज द्या शहापुर येथे घडलेल्या घटनेपासुन आम्ही अर्ज घेतल्याशिवाय पिंजरा लावत नाही असे सांगून अर्ज करा लगेच पिंजरा लावला जाईल असेही श्रीमती माने यांनी सांगितले आता पिंजरा केव्हा लागतो याची बेलापुरकरांना प्रतिक्षा आहे मात्र पिंजरा लावाण्याआगोदर काही घटना घडली बिबट्याने कुणावर हल्ला केला तर जबाबदार कोण राहील असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत