श्री साईबाबा पावन प्रतिष्ठाणच्या वतीने १२९ दिव्यांगांना मान्यवराच्या उपस्थितीत साहीत्य वाटप
श्री साईबाबा पावन प्रतिष्ठाणच्या वतीने १२९ दिव्यांगांना मान्यवराच्या उपस्थितीत साहीत्य वाटप
श्री साई पावन प्रतिष्ठाण ,श्री साई सेवा समिती, भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती जयपुर यांच्या संयुक्त विद्यमाने व श्री साईबाबा मंदिरांच्या सातव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधुन जयपुर फुट व कँलीपर क्रचेस व व्हील चेअर यांच्या वतीने गरजु व विकलांग व्यक्तीसाठी आयोजित शिबीरात १२९ विकलांग व्यक्तींना विविध साहीत्याचे मोफत वाटप करण्यात आले श्री साईबाबा मंदिराच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधुन दिव्यांग व्यक्तीसाठी विविध साहीत्य वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री साई पावन प्रतिष्ठाणचे अध्यक्ष कैलास चायल हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच महेंद्र साळवी माजी नगराध्यक्षा राजश्रीताई ससाणे करण ससाणे सचिन गुजर प्रेरणा पतसंस्थेचे चेअरमन सुरेश वाबळे श्रीरामपुर केमिस्ट असोसिएशनचे तालुकाध्यक्ष जालींदर भवर ,शरद सोमाणी, संतोष भंडारी, शिवाजी कपाळे, प्रविण लुक्कड, शरद नवले, अरुण पा नाईक, रविंद्र खटोड, गणपत मुथा, पंडीत महेश व्यास, अशोक राशिनकर आदि मान्यवर उपस्थित होते या वेळी माजी नगराध्यक्षा राजश्रीताई ससाणे सचिन गुजर माजी नगरसेवक अशोकनाना कानडे शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे सुरेशराव वाबळे शरद सोमाणी आदिंनी मनोगत व्यक्त करताना दिव्यांगाकरीता आयोजित करण्यात आलेल्या शिबीराचे कौतुक करुन चांगला उपक्रम राबविल्याबद्दल कैलास चायल व त्यांच्या सर्व टिमला धन्यवाद दिले या शिबीरात दिव्यांगाना २५ व्हील चेअर ,२० कुबड्या ७ वाँकर १० तिन पायांची काठी १० साधी काठी तसेच राज्यातील विविध जिल्ह्यातुन आलेल्या ४४ दिव्यांगाना जयपुर फुटचे वितरण करुन त्यांना डाँक्टर नारायण व्यास यानी रुग्णाना व्यवस्थीत चालवून स्वतः खात्री करुन घेतली तसेच २० पोलीओग्रस्त रुग्णांना कँलिपर बसवुन देण्यात आले डाँक्टर नारायण व्यास यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्रज्ञ समीर बुतकर ,प्रमोद सिंग ,जितेंद्र तोमर ,राजेश देऊगळे राधेशाम संकपाळ लक्ष्मण गायकवाड निलेश जाधव यांनी पाय बसविण्यासाठी तसेच कँलिपर बसविण्यासाठी विशेष परिश्रम घेतले तीन दिवस चाललेल्या या शिबीरात शेगाव धुळे येवला लासलगाव साक्री मालेगाव वैजापुर बुलढाणा नाशिक तसेच जिल्ह्यातील संगमनेर शेवगाव राहुरी शिर्डी राहाता श्रीरामपुर येथील दिव्यांगानी सहभाग घेतला होता .विविध भागातुन आलेल्या दिव्यांगाची तीन दिवस राहण्याची चहा नाष्टा व भोजनाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते शिबीराचा समारोप सामाजिक कार्यकर्ते सुवालाल लुंक्कड यांचे उपस्थितीत करण्यात आला या वेळी किराणा मर्चड असोसिएशनचे शांतीलाल हिरण व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लढ्ढा संजय भोंडगे पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा दयानंद शेंडगे ,अनिल पवार ,अमोल गाढे , अनिल मुंडलीक ,राजेंद्र बनभेरु ,भरत बाठीया ,रविशेठ चुग ,राजेंद्र थोरात ,अशोक अंबिलवादे ,दत्तात्रय मुसमाडे आदिसह नागरीक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री साई पावन प्रतिष्ठाणचे सचिव राजेंद्र लखोटीया उपाध्यक्ष दिपक सिकची ,खजिनदार संजय लढ्ढा सहसचिव रामविलास झंवर प्रशांत बिहाणी ,रमेश पवार शशिकांत कापसे ,प्रमोद कर्डीले, दिपक क्षत्रीय,धनंजय पवार, श्वेता मेडीकल आदिंनी विशेष परिश्रम घेतले प्रकाश जाजु मित्र मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते