लंपी आजारामुळे पशुपालकांची चिंता वाढली.
लंपी आजारामुळे पशुपालकांची चिंता वाढली.
कारेगाव येथील पशुवैद्यकीय दवाखाना कारेगाव विभागामार्फत लंपी या संसर्गजन्य आजारावरती लस मोहीमेला सुरुवात. कारेगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात मार्फत लंपी आजारावर लस मोहीम सुरू करण्यात आली आहे लंपी या आजाराचे पशु मोठ्या प्रमाणात आढळून येत असून या आजारावरती आळा बसविण्यासाठी कारेगाव येथील माजी सभापती भाजपा तालुका अध्यक्ष दीपक अण्णा पटारे यांच्या विशेष प्रयत्नांतून लंपी या आजारावरती शासनाकडे पाठपुरवठा करून मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध करून देण्यात आली आहे ही लस उपलब्ध होताच कारेगाव येथील पशुपालक शेतकरी यांनी दिपक आण्णा पटारे तसेच महंत किसन महाराज पवार अध्यक्ष मुकूंदराज संस्थान अंबाजोगाई बिड यांच्या उपस्थितीत डॉ.रोहिदास काळे यांच्या हस्ते पशुना लस देण्यात आली व राहिलेल्या पशुना दोन दोन ते तीन दिवसांमध्ये लसीकरण पूर्ण करण्यात येईल असे सांगितले या प्रसंगी डॉक्टर शशिकांत खामकर डॉक्टर रोहिदास काळे पशुवैद्यकीय दवाखाना कारेगाव यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले मार्गदर्शन करताना शेतकऱ्यांना सांगितले आपल्या जनावरांची पावसाळ्यात अशा पद्धतीने घ्या काळजी.
पावसाळ्यात जनावरांची विशेष काळजी घ्यावी लागते. या दिवसात अनेक आजारांचा प्रसार होत असतो. दरम्यान जिल्ह्यात लंपी आजाराचा प्रसार झाला असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. खरीप हंगामाच्या दिवसामध्ये जनावरे आजारी होत असल्याने पशुपालक चिंतेत आहेत. दरम्यान या आजाराची लस उपलब्ध नसल्याने पशुपालकांची चिंता अधिक वाढली आहे. जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागानेही नियोजन केले असून गावागावत निहिर आयोजित केले आहे. दरम्यान या आजाराशी दोन हात करण्यासाठी जनावरांचा गोठा स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. गोठ्यात पाणी साचू देऊ नये यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. गाई-म्हशीमधील सर्व वयाच्या जनावरांना हा आजार रोग होऊ शकतो. परंतु लहान वयाच्या जनावरांना याचा संसर्ग होण्याची शक्यता असते. लंपी आजाराची काय आहेत लक्षणे हा विषाणूजन्य आजार असल्याने बाधित जनावरे अशक्त होतात. जनावरांची दूध उत्पादन क्षमता घटते. प्रजनन क्षमतेवरही विपरित परिमाण होतो. सुरुवातीस २ ते ३ दिवस जनवारांना बारिक ताप जाणवतो. यानंतर जनावरांच्या सर्व शरीरावर कडक व गोल आकाराच्या गाठी येतात. या गाठी साधारणपणे पाठ, पोट, पाय व जननेंद्रिय आदी भागात येतात. बाधित जनावरांच्या डोळ्यातून व नाकातून पाणी येते. तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो. पायावरील गाठींमुळे जनावरांना चालताना त्रास होतो. लंपी आजाराचा संसर्ग न होण्यासाठी काय करावे निरोगी जनावरांना या आजाराचा संसर्ग होऊ नये, यासाठी बाधित जनावरे वेगळी बांधावीत. प्रसार बाह्य कीटकांद्वारे होत असल्याने आजारी नसलेल्या जनावारांना तसेच गोठ्यात डास, माश्या, गोचीड आदींचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक औषधांची फवारणी करावी. देशी वशांच्या जनावरांपेक्षा सकरीत जनावरांना याचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक आहे. या प्रमाणे आपल्या पशुची काळजी घ्यावी या विषयी मार्गदर्शन केले याप्रसंगी कारेगाव ग्रामपंचायत सरपंच विजय पटारे अमोल पटारे सदस्य पोपट नागुडे शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पटारे कैलास पटारे सतीश पटारे दत्तात्रय नागुडे डॉक्टर ऋषिकेश पटारे डॉक्टर महेश लवांडे डॉक्टर मयूर लवांडे डॉक्टर ऋषिकेश पवार तसेच पशुपालक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते