समाजाला देण्याची भावना ठेवा”*प्राचार्य -संजय पडोळे

*”समाजाला देण्याची भावना ठेवा”*प्राचार्य -संजय पडोळे
परस्परांना आधार देणारी समाजव्यवस्था हीच भारताची ताकद आहे.वंचिताच्या जगण्याला प्रोत्साहनाचे पाठबळ देत त्यांच्या आयुष्यात माणुसकीचे रंग भरा.गरजवंताला मदत करणे,शैक्षणिक साहीत्य विद्यार्थ्यांना देवून सक्कर मोहन चॅरिटेबल ट्रस्ट राष्र्ट उभारणीचे कार्य करित आहे,असे प्रतिपादन महेश मुनोत माध्य.व उच्च माध्पमिक विद्यालयाचे प्राचार्य संजय पडोळे यांनी केले.
“सक्कर मोहन चॅरिटेबल ट्रस्ट’ मार्फत गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप व शासकीय चित्रकला ग्रेड परिक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांच्य सत्कार समारंभा”त ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर शाळा समितीचे चेअरमन हेमंत मुथा,सक्कर मोहन ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त मंगलाताई कोठारी,अरुणाताई फिरोदिया,डाॅ.किंकलताई पटवा,मनोहर लांडगे,संचालक अशिष कोठारी,उपप्राचार्य भीमराज आव्हाड,पर्यवेक्षिका वंदना आरण्ये आदिसह मान्यवर उपस्थित होते.
सक्कर मोहन ट्रस्टने महेश मुनोत विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना१५०० वह्यांचे वितरण केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हर्षल कुलकर्णी यांनी तर आभार बाबासाहेब पटारे यांनी मानले.
कला संचालनालय,महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकाला परीक्षेचा महेश मुनोत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून एलिमेंटरी व इंटरमिजीएट या दोन्ही परीक्षेचा १००% निकाल लागला असून एलिमेंटरी ग्रेड परीक्षेमध्ये २८ विद्यार्थी परीक्षेस बसले. त्यापैकी १२ विद्यार्थी अ श्रेणीत तर १० विद्यार्थी ब श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्याचप्रमाणे इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत ३५ पैकी ४ विद्यार्थी अ श्रेणीत, २८ विद्यार्थी ब श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यांचा सत्कार आज करण्यात आला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे प्रमुख कार्यवाह श्रीमती छायाताई फिरोदिया सहकार्यवाह गौरव फिरोदिया तसेच शाळा समितीचे को-चेअरमन हेमंत मुथा, प्राचार्य संजय पडोळे, उपप्राचार्य भिमराज आव्हाड, पर्यवेक्षिका वंदना आरण्ये,कला विभाग प्रमुख वैजीनाथ,वाघमारे,सचिन घोडे, बाबासाहेब पटारे,शिवाजी मंडलिक,संभाजी पवार,संजय तमनर व सर्व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले.