अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर करण्यास महाराष्ट्र सरकार अनुकूल
अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर करण्यास महाराष्ट्र सरकार अनुकूल असून त्या नामांतरास विरोध करणाऱ्या प्रवृत्तीला धनगर समाज धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही.
*सकल धनगर समाज राहुरी तालुका*
दि-०४/०१/२०२३ रोजी सकल धनगर समाज राहुरी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठान राहुरी ,यशवंत सेना, धनगर समाज युवा मल्हार सेना, धनगर ऐक्य परिषद,धनगर समाज उन्नती मंडळ, यशवंत प्रहार संघटना,यांच्या वतीने राहुरी *तहसीलदार मा.शेख* यांना अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर *पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर* असे करावे अशा मागणीचे निवेदन देण्यात आले या वेळी *अहिल्या भवन राहुरी येथे धनगर समाज बांधवांची बैठक* आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये *आमदार मा.गोपीचंद पडळकर* यांनी विधान परिषदेमध्ये ठराव मांडला व शिंदे- फडणवीस सरकारने त्यास सहमती दर्शविली याबाबत अभिनंदनचा ठराव मांडण्यात आला तसेच या मागणीला विरोध करणारे *खासदार मा.सुजय विखे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे* यांचा निषेध करण्यात आला.यावेळी उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन करताना *यशवंत सेनेचे जिल्हाप्रमुख मा. विजय तमनर* यांनी सांगितले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या जरी धनगर समाजाच्या असल्या तरी अखंड हिंदू समाजाविषयी त्यांचे कार्य मोठे आहे त्यांचे जन्मगाव हे नगर जिल्ह्यातीलच असून नामांतर केल्याने नगर जिल्ह्याचे नाव मोठे होईल तरी अशा महान व्यक्तीच्या नावाला कुणीही विरोध करू नये या मागणीसाठी नगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरीय निवेदने देऊन येत्या आठ दिवसांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर या मागणीचा मोर्चा नेण्यात येईल यापुढे जर कोणी या नावाला विरोध करण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल.
या बैठकीसाठी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे *उपसभापती मा.अण्णासाहेब बाचकर*, वावरथ सरपंच ज्ञानेश्वर बाचकर,जांभळीचे सरपंच रामदास बाचकर,पिंपरी अवघड चे सरपंच श्रीकांत बाचकर,अहिल्यादेवी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष दत्ताभाऊ खेडेकर, सामाजिक कार्यकर्ते महेशभाऊ तमनर,डॉ.किशोर खेडेकर, भारत मतकर,यशवंत सेनेचे तालुकाप्रमुख भागवत झडे, बिरोबा देवस्थान ट्रस्टचे भास्कर मंचरे,कोंडीराम बाचकर, दादाभाऊ तमनर, संदीप तमनर, धामोरीचे माजी सरपंच अनिल माने, पिंपरी अवघड चे उपसरपंच दत्तात्रय बाचकर, धनगर समाज युवा मल्हार सेनेचे हरिभाऊ चोरमले,संतोष झडे,मार्केट कमिटीचे माजी संचालक कैलास केसकर,यशवंत सेनेचे रामदास बाचकर,कुरणवाडी चे सरपंच सर्जेराव केदारी,डॉ.किरण सरोदे संभाजी भुसारी,उमेश बाचकर, संजय गावडे, किरण भिसे,प्रमोद चितळकर, राजूभाऊ कांदळकर, राजू वाघ,अण्णासाहेब खिल्लारी आदी उपस्थित होते.
*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाला विरोध करणाऱ्या विखे पिता-पुत्राला धनगर समाज आगामी काळात धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही मा.ज्ञानेश्वर बाचकर (सरपंच वावरथ जांभळी)*