एक बळी गेला….तरीही डोळे उघडले नाही. आळंदी ग्रामीण रुग्णालयाकडे जाणार रस्त्यावर भाजीवाल्यांचे अतिक्रमण कायम*
*एक बळी गेला….तरीही डोळे उघडले नाही. आळंदी ग्रामीण रुग्णालयाकडे जाणार रस्त्यावर भाजीवाल्यांचे अतिक्रमण कायम*
ग्रामीण रुग्णालय च्या रस्त्यावर तातडीची मदत मिळावी यासाठी रुग्णवाहिकेमध्ये एका महिलेचा भाजीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे,नजरेसमोर हॉस्पिटल असतानाही मृत्यू झाला.ही बाब खूप गंभीर होती. नंतर आळंदी नगरपरिषद,आळंदी पोलीस स्टेशन यांनी संयुक्त कारवाई करत.भाजीवाल्यांना आळंदी ग्रामीण रुग्णालय ते आळंदी पोलीस स्टेशन च्या रस्त्यावर बसण्यास प्रतिबंध केला होता आणि सदर रस्त्यावर भाजीविक्री केल्यास कारवाई करण्याचे आदेश दिले.सातत्या न राहिल्याने हे भाजीवाले पुन्हा रस्त्यावर बसून केलेल्या नियमांना मानत नसल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावर दोन्ही बाजूने भाजीवाले बसल्याने ग्रामीण रुग्णालय कडे जाणाऱ्या रस्त्याकडे मोठी अडचण निर्माण झाली आहे. नागरिकांमध्ये याबाबत नाराजी असून भाजीवाल्यांच्या बेशिस्त पनामुळे. वैद्यकीय सुविधा मिळण्यात गोरगरीब रुग्णांना अडचणी येऊन जीवित हानी होऊ शकते, याबाबत चिंता व्यक्त केले जात आहे.
त्यासाठी आळंदी नगरपरिषद आणि आळंदी पोलीस स्टेशन यांनी संयुक्त कारवाई करत मागील वेळेप्रमाणे सदरच्या भाजीवाल्यांच्या अतिक्रमणाला प्रतिबंध करावे आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्या ग्रामीण रुग्णालय कडे जाणारा रस्ता मोकळा व्हावा अशी मागणी तळागाळातून होत आहे. सदर भाजीवाल्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास, त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालयात येणारे रुग्ण यांना होणाऱ्या विनाकारण त्रासाबद्दल ग्रामीण रुग्णालय प्रशासनही त्रस्त झाले आहे. व त्यांच्याकडूनही ग्रामीण रुग्णालय ते आळंदी पोलीस स्टेशन रस्त्यावर बसणाऱ्या भाजीवाल्यांवर कारवाई करण्याची गरज असल्याची व्यथा मांडली आहे. मागील वेळी अत्यावस्त असलेल्या महीला रुग्णाला रुग्णवाहिकेत घेऊन आलेले रुग्ण आणि नातेवाईक पोलीस स्टेशन ते ग्रामीण रुग्णालय हाकेच्या अंतरावर असणारा रस्ता अतिक्रमणामुळे पार करू शकले नाही.आणि त्यामुळे रुग्ण महिलेचा मृत्यू झाला.त्यामुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली गेली होती. गरोदर महिला याही अत्यावस्थ अवस्थे मध्ये ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल होण्यासाठी याच मार्गे येत असतात. भविष्यात पुन्हा अशी अप्रिय घटना घडू नये त्यासाठी कारवाईची गरज बोलून दाखवली जात आहे.