दुर्दैवी मृत्यूने मन हेलावले,अट्टाहासाने मृत्यू की बळी याची सर्वत्र चर्चा*

*आळंदीतील दुर्दैवी मृत्यूने मन हेलावले,अट्टाहासाने मृत्यू की बळी याची सर्वत्र चर्चा*
आळंदीत रविवार दिनांक 5 मार्च रोजी एका 21 वर्षे युवतीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे आळंदी ग्रामीण रुग्णालयातील समोरच्या जागेमध्ये वारंवार कारवाई करूनही अट्टाहासाने बसणाऱ्या भाजीवाल्यामुळे हाकनाक बळी गेल्याची चर्चा आळंदीत आहे, या मृत्यूने मनाला हेलावणारी ही घटना आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे, आळंदी पोलीस स्टेशन ते आळंदी ग्रामीण रुग्णालय काहीशा अंतरावर जीवात जीव असताना श्वास चालू असताना सुद्धा, हाकेच्या अंतरावर जीव वाचवणारी यंत्रणा असते,परंतु ती जीव वाचू शकत नाही,ही घटना मनाला चटका लावून गेली, आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या बाहेर रहदारीसाठी रस्त्यावर अडथळा असणारी भाजी वाल्यांची दुकाने, दुचाकी यामुळे रुग्णालयात पोहोचायला विलंब झाला, आणि 21 वर्षीय महिला हिचा काही क्षणात डोळ्यासमोर मृत्यू झाला, मृत महिलेचे नाव उज्वला नामदेव झाडे व 21 वर्षे आहे, घराच्या गॅलरीतून आंब्याच्या झाडावरील आंबे काढत असताना, तिचा तोल गेला आणि जमिनीवर खाली जमिनी वर पडून डोक्यालाही गंभीर मार लागला, मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता,ही परिस्थिती पाहता तात्काळ रुग्णवाहिकेतून या युवतीला रुग्णालयाच्या दिशेने नेण्यात आले,तिचा श्वास चालू होता, मात्र प्राथमिक उपचार वेळेत न मिळाल्याने या तरुणीला आपला जीव कमावा लागला ,किंबहुना भाजीवाल्यांचा रस्त्यात दुकाने टाकण्याच्या अट्टाहासाने हा बळी घेतला, असे म्हणणे चुकीचे नाही, याबाबात प्रशासन कारवाई करताच , विवीध संघटना प्रशासनावर दबाव आणत होत्या, त्यामुळें काही काळ गेट पर्यंत भाजी विक्रेते बसण्यास प्रतिबंध झाला, परंतु तो काही काळ साठीच, आणि प्रशासनाने केलेले दुलक्ष ही या मृत्यूस कारण ठरले आहे, रुग्णवाहिकेतून त्या युवतीला रुग्णालयात आणत असताना,आळंदी पोलीस स्टेशन ते आळंदी ग्रामीण रुग्णालय या रस्त्यावर दुतर्फा बेकायदेशीर असलेल्या हातगाड्या, भाजीवाल्यांची दुकाने,इतर विक्रेते,तसेच दुचाकी पार्किंग यामुळे मोठ्या प्रमाणात रहदारीस अडथळा झाला, आणि पंधरा ते वीस मिनिटात चा विलंब हा त्या युवतीच्या जीवावर बेतला असल्याची माहिती डॉक्टर शुभांगी नरवडे यांनी दिली आहे ,डॉक्टर शुभांगी नरवडे यांनी रुग्णवाहिके चा आवाज ऐकून प्राथमिक उपचारासाठी असणारी यंत्रणा सज्ज करण्यास सांगितले, परंतु मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याचे निमित्त अथवा वेळेत उपचार न मिळाल्याच्यायलामित्त होत या 21 वर्षे युवतीला आपला जीव गमवावा लागला,पोलीस प्रशासन व आळंदी नगरपरिषद वारंवार कारवाई करून सुद्धा अट्टाहासाने झालेला मृत्यू की बळी याबाबत आळंदी चर्चा आहे