भोकरला जगदंबा प्रासादिक विद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात

भोकरला जगदंबा प्रासादिक विद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात
टाकळीभान प्रतिनिध- शाळेतील मस्ती, एकत्रितपणे
केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील बचक, शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम, सहल अशा विविध विषयांवर जुन्या आठवणींना उजाळा देत गप्पांच्या ओघात सर्वजण आपण इतके मोठे झालो व जगदंबा विद्यालयात बावीस वर्षापुर्वी दहावी तुन शिक्षण घेवुन आज स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने एकत्र येऊन विद्यार्थी व शिक्षक वृंद यांच्या स्नेह भेटीचा आनंद स्नेहमेळाव्याच्या निमीत्ताने उपस्थितांनी व्दिगुनीत केला.
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील जगदंबा प्रासादिक विद्यालयातील इयत्ता १० वीच्या २००३/०४ सालच्या बॅच मधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा गुरुवार दि. २२ मे रोजी उत्साहात साजरा झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगदंबा विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ, अविनाश महाजन होते. तर व्यासपीठावर भिमाशंकर शेळके सर, क्षेत्रे सर, दुधार सर, झावरे सर, बेरड मॅडम, शेळके मॅडम, सरोदे मॅडम, सरपंच पती प्रताप पटारे, शाळा व्यावस्थापनचे अध्यक्ष रावसाहेब लोखंडे, पत्रकार हरिभाऊ बिडवे, आदी उपस्थित होते.
कार्यक्रमप्रसंगी भारतातील पहिल्या महीला शिक्षीका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पन करून दिप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी डॉ महाजन, सर, शेळके सर, दुधाट सर, क्षेत्रे सर, झावरे सर, बेरड मॅडम, सरोदे मॅडम, प्रताप पटारे, पत्रकार हरिभाऊ बिडवे, राऊसाहेब लोखंडे यांनी मनोगत व्यक्त करत आजरोजी दिवंगत काही शिक्षकांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
जवळपास २२ वर्षानंतर या विद्यालयात शिक्षण घेतलेल्या माजी विद्याथ्याँच्या भेटी होवून जुन्या आठवणीना उजाळा मिळाला. या शाळेत शिक्षण घेतलेल अनेक विद्यार्थी आज राजकारण, उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात काम करीत असून त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे. यावेळी या बॅचच्या विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यालयास पाच सिलींग फॅन भेट देण्यात आले. याप्रसंगी शाळेतील माजी विद्यार्थी विद्यार्थ्यांनी आपला परिचय देवून त्या वेळेच्या काही गमतीदार आणि काही चांगल्या आठवणीना उजाळा दिला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजेश चव्हाण, ऋषिकेश झिने, गणेश मुठे, ऋषिकेश शिंदे, मनोज वैरागर, रमेश खंडागळे, शुभांगी काळे, निता शिरसाठ, यांचेसह बॅचच्या विद्यार्थ्यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगीता चतुर यांना केले सुत्रसंचालन विद्यार्थीनी प्रा. उज्वला पटारे यांनी तर आभार पल्लवी चौधरी यांनी केले.