आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र

राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव व विज्ञान प्रदर्शन 2022 चे बक्षीस वितरण संपन्न*

*राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव व विज्ञान प्रदर्शन 2022 चे बक्षीस वितरण संपन्न*

 

*गटशिक्षणाधिकारी कार्यालय पंचायत समिती अंबाजोगाई व शिक्षक मैत्री प्रतिष्ठान अंबाजोगाई च्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय विज्ञान गणित व पर्यावरण प्रदर्शन 2022 तसेच राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव अंबाजोगाई चे बक्षीस वितरण संपन्न झाले*

   *या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबाजोगाई तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री शेख चांद साहेब स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय अंबाजोगाई च्या सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ नितीन चाटे शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय दादा रापतवार उपाध्यक्ष अनुरथ बांडे कोषाध्यक्ष दत्ता देवकते सदस्य माजी नगरसेवक सुनील व्यवहारे माजी गटशिक्षणाधिकारी श्री चंदन कुलकर्णी उपस्थित होते*

   *कार्यक्रमाच्या सुरुवातीस अध्यक्ष व पाहुण्यांच्या हस्ते शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व कार्यक्रमास सुरुवात झाली सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय रापतवार यांनी केले*

   *यावेळी सन 2022 मध्ये कोरोना काळात घेण्यात आलेल्या ऑनलाईन विज्ञान प्रदर्शन मधील विजेते विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक तसेच राष्ट्रीय नाट्योत्सव 2022 मधील विजेते विद्यार्थी व शिक्षक या सर्वांना सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले*

    *यावेळी प्रमुख पाहुणे डॉ नितीन चाटे यांनी सर्व विद्यार्थ्यांनी अल्बर्ट आईन्स्टाईन सारखा आदर्श घेऊन विज्ञान क्षेत्रात आपला ठसा उमटवावा अशा प्रकारचे मार्गदर्शन केले यावेळी डॉ नितीन चाटे यांनी केलेल्या”हर्निया”या आजाराच्या संशोधनाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतल्याबद्दल त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला*

    *अध्यक्षीय समारोप करताना गटशिक्षणाधिकारी श्री शेख चांद यांनी विद्यार्थ्यांनी आपला वैज्ञानिक दृष्टिकोन नेहमी जागृत ठेवावा व शिक्षण विभागाच्या वतीने वेळोवेळी आयोजित केलेल्या विविध उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन केले तसेच सदरील उपक्रमास शिक्षक मैत्री प्रतिष्ठानने केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले*

   *सदरील नाट्योत्सव स्पर्धेसाठी निरीक्षक म्हणून. योगेश्वरी महाविद्यालयाचे प्रा.माळी एच एस, प्रा.नाकलगावकर एस ए तसेच खोलेश्वर महाविद्यालयाचे प्रा.जोशी पी पी, प्रा.हिवरेकर पी पी व श्रीमती प्रा.अनुपमा जाधव यांनी काम पाहिले*शेवटी विषयतज्ञ श्री महेश पवार सर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले सूत्रसंचालन शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे जेष्ठ मार्गदर्शक श्री विष्णू सरवदे यांनी केले*

Rate this post
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे