परळी २७ नोव्हेंबर रोजी बौद्धधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन. बालासाहेब जगतकर*.

*परळी २७ नोव्हेंबर रोजी बौद्धधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन. बालासाहेब जगतकर*.
परळीत 27 नोव्हेंबर 2022 रोजी बौद्ध धर्मिय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा साप्ताहिक मानपत्र चे संपादक बालासाहेब जगतकर यांनी दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की परळी व परळी तालुक्यातील सर्व बौद्ध बांधवांना कळविण्यात येते की तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था भिम नगर व साप्ताहिक मानपत्र परळीच्या वतीने 27 नोव्हेंबर 2022 रविवार रोजी बौद्ध धर्मिय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बौद्ध समाजातील लोकांचा अनाथायी खर्च होणे व त्यासाठी कर्जबाजारी होणे व त्यामुळे आर्थिक समस्येच्या खाईत लोटले जाणे हा प्रकार टाळण्यासाठी व समाजातील ज्याची आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या कुटुंबातील नवं वधूवरांना या सामूहिक विवाह सोहळ्यात भाग घेता यावा व सर्व स्तरातील समाज एकत्र यावा हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून या बौद्ध धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून समाजातील जास्तीत जास्त नववधू-वरांच्या पालकांनी या सोहळ्यात सहभाग घेऊन नाव नोंदणी करावी असे आव्हान तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा साप्ताहिक मानपत्र चे संपादक बालासाहेब जगतकर यांनी केले आहे नाव नोंदणी अंतिम दिनांक 30 ऑक्टोबर 2022. नाव नोंदणी लागणारे कागदपत्र. (१) रहिवासी प्रमाणपत्र. (२) जातीचे प्रमाणपत्र. (३) दोन पासपोर्ट फोटो. (४) टीसी ची झेरॉक्स प्रत. (५) शंभर रुपये बॉण्ड वर शपथपत्र. इत्यादी कागदपत्र घेऊन लवकरात लवकर नवा म्हणून मी करण्यात यावी असे आव्हान तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थाचे अध्यक्ष तथा साप्ताहिक मानपत्र चे संपादक बालासाहेब जगतकर यांनी केले आहे.