टाकळीभान येथे भर दिवसा तीन ठिकाणी चोऱ्या 16 तोळे सोनार ६५ हजाराची चोरी

टाकळीभान येथे भर दिवसा तीन ठिकाणी चोऱ्या 16 तोळे सोनार ६५ हजाराची चोरी
टाकळीभान – प्रतिनिधी – टाकळीभान ते घोगरगाव रस्त्यालगत विविध ठिकाणी भर दिवसा चोऱ्या होऊन सुमारे 16 तोळे सोने व 65000 रोकड रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केला चोरीमध्ये महिलांचा समावेश टाकळीभान परिसरामध्ये भीतीचे वातावरण ,
याबाबत सविस्तर माहिती अशी की, टाकळीभान येथील घोगरगाव रस्त्यालगत किरणराव धुमाळ, ज्ञानेश्वर शहराम कोकणे ,तसेच बलही नाला येथील दत्तात्रय गोपीनाथ आघाडे, हे आपल्या शेतामध्ये वस्ती करून राहत आहेत,
आज बुधवार दिनांक 7 मे 2025 रोजी दुपारी दोन वाजता दिवसाढवळ्या अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलपे तोडून आत प्रवेश करून चोरी करून, पसार झाले ,
त्यामध्ये किरणराव धुमाळ यांचे घराचा दरवाजा बंद करून शेजारी घरी बसले असल्याने सुमारे 15 तोळे सोने व रोकड रक्कम साडेचार हजार, अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरातील कपाट कुलपा तोडून चोरून नेले, व ज्ञानेश्वर शहाराम कोकणे यांचे कुटुंबासह बाहेरगावी लग्नाला गेले होते, त्यांच्या घराचे कुलूप तोडून एक तोळा सोने व रोकड पन्नास हजार चोरांनी चोरून नेले,तर बलही नाला येथील दत्तात्रय गोपीनाथ आघाडे हे हळदीच्या कार्यक्रमाला गेले असता, याच संधीचा फायदा घेऊन यांच्या घरातील आठ हजार रुपये अज्ञात चोरांनी लंपास केले.
चोरीमध्ये तीन चोरट्यांचा त्यात एक महिला समावेश असल्याचे बोलले जात आहे,अज्ञात चोरट्यांनी मोटर सायकलचा वापर केला आहे , .
सदर चोरी झाली हे लक्षात आलेले ताबडतोब तालुका पोलीस स्टेशन येथे संपर्क साधला असता, तालुका पोलीस स्टेशनचे पीआय दसरा चौधरी व पीएसआय संदीप मुरकुटे पीएसआय दवले पोलीस फाटा घेऊन घटना ठिकाणी तातडीने हजर झाले, तपास यंत्रणा फिरवली चोरांचा माघ काढण्याचा प्रयत्न चालू आहे, नगर येथे फिंगरप्रिंट पथक कपाटांचे फिंगरप्रिंट व दरवाजांचे तसे घेण्यात आली आहे घेण्यात आले, रात्री उशिरापर्यंत श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे,