शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी अमोल कांबळे.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी अमोल विलास कांबळे.
श्रीरामपूर तालुका . वांगी बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी पालक मेळावा तसेच शालेय व्यवस्थापन समितीची बैठक नुकतीच झाली असून या बैठकीत नुतन व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली.या नुतन शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी अमोल विलास कांबळे यांची तर उपाध्यक्षपदी गोकुळ छबुराव बर्डे यांची निवड करण्यात आली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांगी बुद्रुक या शाळेत शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज राज्यातील विविध क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे काम करत आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची पटसंख्या कमी असताना गावातील शाळेचे नाव लौकिक तालुक्यात व्हावे यासाठी पुर्ण वेळ काम करणाऱ्या अध्यक्षाची नेमणूक झाल्यामुळे गावातील शिक्षणासाठी या नव निर्वांचीत अध्यक्षांचा नकिच विद्यार्थी पालक शिक्षक यांना फायदा होईल विद्यार्थी घडत असताना शिक्षकांना येणाऱ्या अडचणीतुन मार्ग काढण्यासाठी योग्य प्रतिनिधी योग्य पर्याय हे अध्यक्ष नकिच पोहोचतील व पालक विद्यार्थी शिक्षक यांच्या अडचणी सोडविण्यासाठी अविरत प्रयत्न करतील अशी आशा आहे यात काही शंका नाही असे मत अखिल भारतीय मानवाधिकार मिशन अहमदनगर जिल्हा अध्यक्ष श्री धनंजय बाबासाहेब माने यांनी व्यक्त केले तसेच नवनिर्वाचित व्यावस्थापन समिती सदस्य पदावर अध्यक्ष अमोल विलास कांबळे तर स्वत धनंजय माने शालिनी मच्छिंद्र पवार शारदा दिलीप गांगुर्डे रोहीणी पुंजाहरी वंजारी जया बाबासाहेब पिसाळ कमल गोरक्षनाथ पवार बाबासाहेब बिडगर सुनिल चितळकर अमोल आहेर स्वप्निल खेमनर यांची सदस्य पदी निवड करण्यात आली व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक बाबासाहेब मते हे सचिव पदी तर शिक्षक सुनिल बागुल हे शिक्षक प्रतिनिधी पदी तसेच शिक्षक तज्ञ ज्ञानेश्वर लकडे यांची नियुक्ती करण्यात आली या कार्यक्रमा प्रसंगी डुकरे सर प्रमोद सोनकांबळे सर सरपंच ज्ञानदेव बिडगर दिलीप गांगुर्डे काकासाहेब निकम पोपट कांबळे रामभाऊ बर्डे त्याच प्रमाणे मोठा पालक वर्ग उपस्थित होता