सोनई पोलिसांवर कारवाईसाठी शनिवारी पोलिस स्टेशनवर ग्रामस्थांचा विराट मोर्चा.
सोनई– सोनईचे सहायक पोलिस निरिक्षक सचिन बागुल व त्यांचे सहकारी उपनिरिक्षक उमेश पतंगे,रायटर संजय चव्हाण व इतर अनोळखी पोलिस कर्मचारी यांनी राहुरी जवळील पिंप्री येथील रेल्वे उड्डानपुल येथे राजेंद्र रायभान मोहिते रा.गणेशवाडी या युवकाला समज देण्याच्या नावाखाली बेदम मारहाण केली.याच्या निषर्धात सोनई पोलिस स्टेशनवर शनिवार दिनांक 23 एप्रिल रोजी सोनई ग्रामस्थांच्या वतीने विराट मोर्चा व
ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे याबाबत राज्याचे गृहमंञी नाम.दिलिप वळसे पाटील व अहमदनगरचे पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे.
सविस्तर असे कि सोनई पोलिसांनी समज देण्याच्या कारणावरून राजेंद्र मोहिते रा.गणेशवाडी ता.नेवासा या तरूणाला राहुरी जवळील पिप्री उड्डान पुलावर गाडी आडवी लावुन विना सर्च वाॅरंटचे ताब्यात घेतले.तेथेच त्याला जबर मारहाण केली गेली.सोबत असलेल्या एका 17 वर्षीय तरूणाला पण बेडी ठोकुन ताब्यात घेतले.समज देण्याचे कारण देत सोनई पोलिस स्टेशनला नेत पट्टा व लाथाबुक्क्यांनी अमानुषपणे बेदम मारहाण करत सोडुन देण्यात आले.यानंतर राजेंद्र मोहिते या तरूणाच्या कानातुन रक्त येत होते.मुक्या जनावरापेक्षा भयानक मारहाण सोनई पोलिसांनी केली.यामुळे सदर युवकास भोवळ आली त्याला लोणी येथे एका रूग्णांलयात अतिदक्षता कक्षात उपचारासाठी हलवण्यात आले होते.
सोनई पोलिस स्टेशनला कुठलीही तक्रार गुन्हा दाखल नसताना सोनई पोलिसांनी समज देण्याच्या नावाखाली तरूणास केलेल्या बेदम मारहाण केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे.यामुळे सोनईचे सहायक पोलिस उपनिरिक्षक सचिन बागुल,उपनिरिक्षक उमेश पंतगे व सहकारी पोलिसांवर कडक कारवाई व्हावी यासाठी ग्रामस्थांनी राज्याचे गृहमंञी नाम.दिलिप वळसे पाटील,अहमदनगरचे पोलिस अधिक्षक मनोज पाटील,केंद्रीय मानावधिकार आयोग नवी दिल्ली यांच्याकडे निवेदना झालेल्या अन्याया बाबत दाद मागितली आहे.तसेच या घटनेचा निषेध व कारवाईसाठी शनिवार दिनांक 23 एप्रिल रोजी सोनई पोलिस स्टेशनवर शांततेच्या मार्गाने विराट मोर्चा व ठिय्या उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदन देण्यात आले आहे.
खोटे गुन्हे दाखल करू अर्ज मागे घ्या म्हणुण दबाव वाढत आहे.गेली आठ ते दहा वर्षा पासुन काही पोलिस कर्मचारी एकाच ठिकाणी कार्यरत असल्याने सोनई परिरात अवैध धंदाला पाठबळ देत आहे.या पोलिसावर कारवाई व्हावी.तसेच माझ्या भावाला न्याय मिळावा यासाठी शांततेच्या मार्गाने ग्रामस्थासह आंदोलन करणार आहे.–अजय रायभान मोहिते.रा.गणेशवाडी ता.नेवासा
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा