ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

निष्ठावंत शिवसैनिकांना शिवसेनेमध्ये स्थान आहे

निष्ठावंत शिवसैनिकांना शिवसेनेमध्ये स्थान आहे

 

 

निष्ठावंत शिवसैनिकांना शिवसेनेमध्ये स्थान आहे या सर्व शिवसैनिकांची एकत्र मोट बांधून भक्कम संघटन उभे केले जाईल मात्र यासाठी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे हेच केंद्रस्थानी धरून निवडी केल्या जातील येत्या काळात लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांना देखील नगर जिल्ह्यामध्ये पाचरण करून शिवसैनिकांचा भव्य मेळावा आयोजित करणार असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे यांनी केले आहे.

याबाबत माहिती अशी की,उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेने चे जिल्हा संपर्कप्रमुख व वरळीचे आमदार सुनिल शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत राहुरी येथील विद्यापीठ धर्मडी गेस्ट हाऊस येथे उत्तर नगर जिल्ह्यातील सेनेच्या प्रमुख पदाधिकार्यांची उत्तर नगर जिल्ह्यातील नगर परिषदा, पंचायत समित्या, जिल्हा परिषद, लोकभा अदि निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बैठक संपन्न झाली.

यावेळी बैठकीत भावना मांडताना शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की,खा.सदाशिव लोखंडेना निवडुन आणण्यासाठी सच्चा शिवसैनिकांशी मदत केली.

पण खा.लोखंडे हे बेउपकारी आहे.

त्यांनी पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे.

उत्तरेतील सेनेच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळे अमिष दाखवून आपल्या कडे बोलण्याचे काम करत आहेत.

येणार्या काळात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सच्चा शिवसैनिकांना पाठबळ देण्याचे काम केले पाहिजे असा या बैठकीत सुर निघत होता.

यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख आ.सुनिल शिंदे श्रीरामपूर मतदार संघाचे माजी आ. भाऊसाहेब कांबळे, शिवसेना चे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, राजेंद्र झावरे, उपजिल्हा प्रमुख हरिभाऊ शेळके, संगमनेर चे अँड .दिलीप साळगट,कोपरगाव‌ चे नितिन औतडे, अकोले,मच्छिंद्र धुमाळ, नेवासा मच्छिंद्र म्हस्के, संगमनेर जनार्दन आहेर, श्रीरामपूरचे सचिन बडदे राहुरीचे सचीन म्हसे,हमिद पटेल,भागवत मुंगसे,बाबासाहेब मुसमाडे, गणेश खेवरे बाळासाहेब गाडे, पोपट शिरसाठ कैलास शेळके अदिसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      यावेळी सर्वच पदाधिकाऱ्यांनी संपर्कप्रमुख शिंदे यांच्यासमोर भावना मांडताना सांगितले की, उत्तरेचे संपर्कप्रमुख माजीमंत्री बबनराव घोलप यांनी शिवसेनेमध्ये दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे त्याचाच परिपाक म्हणून निष्ठावंत शिवसैनिक नाराज झाला आहे नको त्यांना नको त्या पदावर बसवून त्यांनी खऱ्या व सच्चा शिवसैनिकाचा अपमान केला आहे आम्ही निष्ठावंत असतांना आम्हाला विचारात घेतले जात नाही शिवसैनिक म्हणंजे फक्त गळ्यात,हातात भगवे घालून चालत नाही कार्यकर्त्यांना ताकत देण्याचे काम केले पाहिजे अशी अनेकांनी खंत व्यक्त केली. त्याचबरोबर दुसऱ्या नेत्यांच्या दावणीला बांधल्या जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी पदावरून हटवले पाहिजे अन्यथा शिवसैनिकांमध्ये नाराजी निर्माण होऊन पक्षालाही याचा फटका बसतो आहे असे या वेळी अनेकांनी स्पष्ट केले.

 

 

 

चौकट 

आघाडी बरोबर किंवा स्वतंत्र लढू 

गेली दोन तीन महिने शिवसेनेत खदखद सुरु आहे. शिवसेनेत आलेल्या शिवसैनिकांनी धुडगुस घालण्याचा प्रयत्न केला. शिंदे गटात एकही निष्ठावंन शिवसैनिक गेला नाही. मात्र काहीनी गटबाजी केल्याने या गटबाजीला कंटाळून काहीजण शिंदे गटात गेले. ते पुन्हा शिवसेनेत येतील. आगामी निवडणुका आम्ही शिवसेना म्हणून ताकतीने लढविणार असून जर आघाडी झाली तर आघाडीबरोबर जाऊ. नाही झाली तर स्वतंत्र लढू.

 

पै. रावसाहेब (नाना) खेवरे 

शिवसेना उत्तर जिल्हाप्रमुख ( ठाकरे गट )

Rate this post
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे