मराठी पत्रकार परिषदेच्या नेवासा तालुका अध्यक्षपदी सोमनाथ कचरे.

मराठी पत्रकार परिषदेच्या नेवासा तालुका अध्यक्षपदी सोमनाथ कचरे.
सोनई,पत्रकारांची मात्रु संस्था समजल्या जाणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेची नेवासा तालुका कार्यकारिणी जाहिर करण्यात आल्याची माहिती उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य यांनी दिली.
जिल्हा मार्गदर्शक गुरुप्रसाद देशपांडे ,उत्तर नगर जिल्हा सह सरचिटणीस दिलीप शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झालेल्या बैठकीत सोमनाथ कचरे यांचे नावावर शिक्कामोर्तब करण्यात येऊन उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य यांनी कचरे यांची नेवासा तालुका अध्यक्षपदी तर नामदेव शिंदे आणि आदिनाथ म्हस्के यांची अधिकृत रित्या निवड जाहीर केली.
मराठी पत्रकार परिषद नेवासा तालुका कार्यकारिणी खालीलप्रमाणे:-
अध्यक्ष – सोमनाथ कचरे .कुकाणा (पुण्य नगरी)
कार्याध्यक्ष – अशोक भुसारी. सोनई ( प्रभात)
उपाध्यक्ष – नामदेव शिंदे .भेंडा (पुण्य नगरी)
आदिनाथ म्हस्के. माका (अजिंक्य भारत)
सरचिटणीस – अशोक पेहेरकर .भानसहिवरे (सार्वमत)
पवन गरुड. नेवासा (लोकआवाज)
सह सरचिटणीस – विठ्ठल उदावंत. खरवंडी (सार्वमत)
देविदास चौरे .चांदा (पुढारी)
खजिनदार – राजेंद्र लाटे. चांदा (लोकमत)
सह खजिनदार – संतोष सोनवणे .भेंडा (सकाळ)
संघटक – सतिष उदावंत .नेवासा फाटा (लोकमत)
संपर्क प्रमुख – संतोष टेमक. करजगाव (लोकमत समाचार)
प्रसिद्धी प्रमुख – विजय खंडागळे .सोनई (दिव्य मराठी)
मार्गदर्शक – नवाब शहा. कुकाणा (सार्वमत)
रमेश शिंदे .नेवासा (सार्वमत , जनप्रवास)
अशोक डहाळे .नेवासा (सामना)
सुरेश दारकुंडे .घोडेगाव (समाचार)
विकास बोर्डे .नेवासा (लोकमत , समाचार )
कार्यकारिणी सदस्य – रवी शेटे .शिंगणापूर (प्रभात)
अनिल रोडे .गोणेगाव(पुढारी )
बाळासाहेब पंडित .नेवासा फाटा (जय बाबा)
श्रीनिवास रक्ताटे .नेवासा फाटा (पुण्यनगरी)
मोहन शेगर .सोनई (सार्वमंथन)
सत्तार शेख. देवगड (पुढारी)
नेवासा तालुक्यातील नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारिणीने परिषदेचे नेवासा तालुक्यातील संघटन वाढीसाठी प्रयत्न करेल अशी अपेक्षा जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य व अन्य जिल्हा मार्गदर्शक, सल्लागार ,पदाधिकारी व सदस्य यांनी व्यक्त केली आहे.
नूतन पदाधिकारी व कार्यकारिणीचे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक , प्रदेशाध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख , प्रदेश प्रतिनिधी सुनील नवले , उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य , दक्षिण नगर जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके , डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष आफताब शेख यांचे सह सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.