घरफोडी करणाऱ्या तीन अट्टल दरोडेखोरांना अटक करण्यात पोलिसांना यश
घरफोडी करणाऱ्या तीन अट्टल दरोडेखोरांना अटक करण्यात पोलिसांना यश
घरफोडी करणाऱ्या तीन अट्टल दरोडेखोरांना अटक करण्यात पोलिसांना यश
घरफोडी करणाऱ्या तीन अट्टल दरोडेखोरांना अटक करण्यास श्रीगोंदा पोलिसांना यश आले आहे.किरण उर्फ सोन्या युवराज काळे रा.बिटकेवाडी,ता.कर्जत,प्रविण शहाजी पवार रा.धालवडी ता. कर्जत,इंद्रजित सायट्या पवार रा.कर्जत ता. कर्जत अशी अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत.
७ जून रोजी राजेंद्र श्रीमंत भोस वय ४६ वर्षे रा. तांदळी दुमाला ता.श्रीगोंदा यांनी फिर्याद दिली होती की तांदळी दुमाला येथील त्यांच्या राहत्या घराच्या दरवाजाची कडी कोयडा तोडून घरात प्रवेश करून कपाटात ठेपलेले रोख रक्कम व सोन्याचे दागिने चांदीच्या पट्टया कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेले आहे. त्याबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुरजि नं. ३१०/२०२२ ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपास चालू असताना रामराव ढिकले पोलीस निरीक्षक श्रीगोंदा पोलीस स्टेशन यांना खात्रीलायक माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा सराईत गुन्हेगार किरण उर्फ सोन्या युवराज काळे, प्रविण शहाजी पवार, इंद्रजित सायट्या पवार यांनी केला आहे. त्यावरून गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी कर्मचारी यांना गुन्हेगारी वस्त्यांवर कोंबिंग ऑपरेशन करण्यास सांगुन आरोपी ताब्यात घेण्यास सांगितले .
सदर आरोपी हे बिटकेवाडी ता.कर्जत येथे आल्याची माहीती मिळाल्यावरून दि.१० जून रोजी बिटकेवाडी ता. कर्जत येथे कोंबिंग करुन त्यांना ताब्यात घेतले. आरोपींकडे वरील गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. आरोपींकडे कसून चौकशी केली असता घरफोडी केल्याची कबुली दिली. संशयित आरोपी इंद्रजित सायट्या पवार याचेकडे चौकशी केली असता त्याने चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. आरोपींकडून दोन्ही गुन्ह्यात चोरीस केलेला मुद्देमाल १ लाख ४५ हजार किमतीचा त्यात सोन्याचे दागीने २८ ग्रॅम वजनाचे व चांदीचे दागीने ७० ग्रॅम वजनाचे असे हस्तगत करण्यात आले आहे.
आरोपी किरण काळे व प्रविण पवार हे चोरीच्या गुन्ह्यामध्ये पोलीस कस्टडी मध्ये आहे. दोन्ही आरोपीकडे कसून चौकशी केली असता त्यांनी त्यांचे ईतर ३ साथीदारांसह दौंड व आळेफाटा या ठिकाणी दरोडा व घरफोडी गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
तीनही गुन्हेगार हे दरोडा व घरफोडी करणारे सराईत गुन्हेगार आहेत. आरोपी हे पोलीस कस्टडी मध्ये असुन त्यांचेकडुन आणखी गुन्हे उपडकीस येण्याची शक्यता आहे. या आरोपीकडून लाख ४५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे घरफोडीचे ०२ गुन्हे उघडकीस आले आहेत. पुणे ग्रामिण येथिल दरोड्याचे ०२ गुन्हे व घरफोडीचा ०१ गुन्हा उघडकीस आला आहे. आळेफाटा पोलीस स्टेशन पुणे ग्रामिण येथिल घरफोडीचा ०१ गुन्हा असे एकुण ०६ गुन्हे उघडकीस आले आहेत.