आमदार निलेश लंके समवेत सिद्धार्थ मुरकुटे यांची टाकळीभान येथील कार्यकर्त्यांच्या घरी सदिच्छा भेटी.
आमदार निलेश लंके समवेत सिद्धार्थ मुरकुटे यांची टाकळीभान येथील कार्यकर्त्यांच्या घरी सदिच्छा भेटी.
हजारो कोरोना बाधित रुग्ण यांना जीवनदान देणारे महाराष्ट्रातील लोकप्रिय आमदार निलेश लंके व श्रीरामपूर तालुक्याचे युवक नेते, मुळा प्रवराचे संचालक सिद्धार्थ मुरकुटे यांनी टाकळीभान ता. श्रीरामपूर येथील टाकळीभानचे ग्रामपंचायत सदस्य मयुर पटारे पाटील यांच्या निवासस्थानी नुकतीच सदिच्छा भेट दिली. दोघांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना आ.लंके म्हणाले की, अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचा वयाच्या ८१ व्या वर्षी देखील कामाचा उत्साह जशाचा तसा असून मुरकुटेंच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ग्रामपंचायत टाकळीभानच्या विकासासाठी शुभेच्छा दिल्या.तसेच मयुर पटारे व मित्र मंडळाच्या जय हनुमान तरुण गणेश मंडळात गणपतीची आरती त्यांच्या शुभहस्ते करण्यात आली, यावेळी मंडळाच्या नियोजनाचे कौतक करत मंदिर परिसर स्वच्छ व सुंदर ठेवल्याबद्दल मंडळातील अध्यक्ष पंकज परदेशी व उपाध्यक्ष मंगेश पटारे यांचा सत्कार आमदार लंके यांनी केला व गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी काळजीपूर्वक नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आणि मदत लागल्यास टाकळीभानकरांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहणार असल्याचे युवकांना सांगितले.
यावेळी माजी सरपंच बंडू पाटील पटारे, लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष शिवाजीराव शिंदे, अशोकचे संचालक यशवंत रणनवरे, किशोर पटारे, अशोकराव पटारे, पोपटराव पटारे, शिवाजी पटारे, विजय पटारे, सुरेश पटारे,ग्रामपंचायत सदस्य सुनील बोडखे, माऊली पटारे, बंडेराव तरहाळ, बबलू वाघुले, कुलदीप परदेशी, अजय दुधाळे, किरण ब्राम्हणे, विकास साध्ये, अक्षय शिंदे, आदिनाथ काटे, सूरज शिंदे, शिवराज पटारे, सागर पटारे आदी उपस्थित होते.