विठूनामाच्या गजरात गेवराईतून दिंड्यांचे पंढरपूरला प्रस्थान*
*विठूनामाच्या गजरात गेवराईतून दिंड्यांचे पंढरपूरला प्रस्थान*
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठू माउलींच्या दर्शनाची आस वारकऱ्यांना लागली आहे. उद्या संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा प्रस्थान होत असल्याने गेवराई तालुक्यातील दिंडयांही पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत. जून महिना आला की वारकऱ्यांना आस लागते ती आषाढी एकादशीची. एक महिन्यांचा पायी प्रवास करत वारकरी विठू नामाच्या गजरात विठ्ठलाच्या भेटीला पंढरपुरला जातात. दरवर्षी गेवराई तालुक्यातीलही अनेक दिंड्या आषाढी वारीला जात असतात. पण कोरोनामुळे दोन वर्षांचा खंड पडला. तब्बल दोन वर्षांच्या खंडानंतर आज दिंड्या प्रस्थान करत आहेत. अनेक गावांतून हजारो वारकरी दिंड्यांमध्ये सामील होणार आहेत. याची देही याची डोळा विठूरायाचे सावळे रूप पाहण्याची आतुरता वारकऱ्यांना लागली आहे.
गेल्या ३१ वर्षांपासून आषाढी वारीला पंचक्रोशीतील वारकरी जमवून पंढरपूरला पायी जातो. तिथे गेल्यावर विठ्ठलाच्या दर्शनाने एक नवीन ऊर्जा प्राप्त होते.