बेलापुर ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या पुस्तक प्रदर्शनास वाचकाचा चांगला प्रतिसाद

बेलापुर ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या पुस्तक प्रदर्शनास वाचकाचा चांगला प्रतिसाद
बेलापुर (प्रतिनिधी )-भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर जयंतीच्या निमित्ताने बेलापुर बु।। ग्रामपंचायतीच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयातील सुमारे १५००० पुस्तकांचे प्रदर्शन अनोखी पर्वणी ठरल्याने या पुस्तक प्रदर्शनाला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.पुस्तक प्रदर्शनाचे उदघाटन ग्रंथालयाचे नियमित वाचक रंगनाथ देवकर, मच्छिंद्र पुंड तसेच सेवानिवृत्त ग्रंथपाल रमेश खरोटे यांच्या हस्ते करण्यात आले.प्रसंगी सरपंच महेंद्र साळवी म्हणाले की,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर जयंतीनिमित्त पुस्तक प्रदर्शन आयोजित केले असून डॉ.आंबेडकरांनी दिलेल्या शिका, संघटित व्हा,संघर्ष करा या मंत्रा प्रमाणे नवीन पिढी घडावी हा या पुस्तक प्रदर्शना मागील हेतु आहे.उपसरपंच अभिषेक खंडागळे म्हणाले की, ग्रामपंचायतीच्या वाचनालयात २०००० पुस्तके असून यात बाल साहित्य,नाटक,कविता संग्रह,प्रवास वर्णने,धार्मिक, स्पर्धा परीक्षा अश्या एकूण १० विभागांची पुस्तके उपलब्ध आहेत. यातील १५००० पुस्तकांचे आज प्रदर्शन आयोजित केले आहे यातून वाचन संस्कृतीचे जतन होऊन नवीन वाचक वर्ग निर्माण होण्यास मदत होईल. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य अरुण पाटील नाईक,पत्रकार देविदास देसाई आदींनी मनोगत व्यक्त केले.पत्रकार विष्णुपंत डावरे यांनी वाचनालयास पुस्तके भेट दिली.यावेळी पंचायत समिती सदस्य अरुण पाटील नाईक,सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे,मारुती राशिनकर,प्रकाश नवले,किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष शांतीलाल हिरण,तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे,किशोर खरोटे,नानासाहेब जोंधळे,जनार्धन ओहोळ,ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत नवले,मुस्ताक शेख, रमेश अमोलिक,पत्रकार देविदास देसाई,विष्णुपंत डावरे,दिलीप दायमा,ज्ञानेश गवले,किशोर कदम,कासम शेख,रुपेश सिकची,प्रकाश कु-हे,रफिक शेख,अकबर सय्यद, रत्नेश गुलदगड,नितीन नवले,सुधीर तेलोरे,तान्हाजी शेलार,जिना शेख,सुधिर तेलोरे,विशाल आंबेकर, गोपी दाणी,अजीज शेख,रोनाल्ड अमोलिक,सुभाष कु-हे,रमेश शेलार,जलील जनाब,जलील शेख,सचिन कडेकर,बाळासाहेब शेलार,महेश ओहोळ आदी उपस्थित होते.प्रदर्शन यशस्वीतेसाठी ग्रंथपाल उज्वला मिटकर-साळुंके,सोपान हिरवे,सुभाष राशिनकर,मधुकर गायकवाड, बाबासाहेब प्रधान,शिला पुंड,निर्मला गाढे,सचिन नगरकर,सचिन साळुंके,रविंद्र मेहेत्रे,विजय खरोटे,अमोल साळवे,अविनाश शेलार,गौरव वाडिया,राजेश गोहेल आदींनी परिश्रम घेतले.पुस्तक प्रदर्शनास विद्यार्थी, महिला,जेष्ठ नागरिक,तरुण आदींसह नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.