बैलगाडा शर्यतीचा थरार, कुस्त्यांचा जंगी हगामा,रहाटपाळणे,पारंपारिक वाद्याच्या गजरात कावडभक्तांची मिरवणुक

बैलगाडा शर्यतीचा थरार, कुस्त्यांचा जंगी
हगामा,रहाटपाळणे,पारंपारिक वाद्याच्या गजरात कावडभक्तांची मिरवणुक
बैलगाडा शर्यतीचा थरार, कुस्त्यांचा जंगी
हगामा,रहाटपाळणे,पारंपारिक वाद्याच्या गजरात कावडभक्तांची मिरवणुक,अशा धार्मिक,
सांस्कृतीक व करमणुकीच्या भरगच्च अशा भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडणा-या कार्यक्रमाने रविवार १७ ते मंगळवार २० एप्रिल या कालावधीत राहुरीचे ग्रामदैवत श्रीखंडेराया महाराजांचा याञा उत्सव साजरा होत असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब यादवराव तनपुरे यांनी दिली.
मागील दोन वर्ष कोरोनाचे संकट असल्याने शासनाच्या फिजीकल डिस्टसिंग या आदेशाचे पालन करण्यासाठी श्री खंडेराया महराज याञा उत्सव स्थगित करण्यात आला होता.यंदा रविवार १७ एप्रिल रोजी याञा उत्सवाला प्रारंभ होणार आसुन २० एप्रिल पर्यंत चालणा-या याञा उत्सवात धार्मिक,सांस्कृतिक तसेच करमणुकीचे भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.रविवार १७ एप्रिलला सकाळी ९ वाजता दक्षिण काशी म्हणुन ओळख असलेल्या श्रीक्षेञ पुणतांबा येथुन गंगेचे पायी पाणी आणणा-या कावडभक्तांची पारंपारीक वाद्याच्या गजरात शहरातुन वाजतगाजत मिरवणुक काढण्यात येणार आहे.गंगेच्या पाण्याने श्रीखंडेराया,
म्हाळसा,बानू या देवदेवतांच्या मुर्तीला आंघोळ घालुन याञा उत्सवास सुरवात होईल.शिर्डीतील साईबाबा मंदिरा प्रमाणे राहुरीतील श्री खंडेराया महाराज मंदिराच्या गाभा-यात व दर्शनी भागात रंगीबेरंगी फुलांचे डेकोरेशन भाविकांना पहावयास मिळणार आहे.
रविवारी सायंकाळी चार वाजता हजारो भाविकांच्या उपस्थितीत याञेचे मुख्य आकर्षण असलेल्या भक्ताच्या कमरेला नाडा बांधून १२ गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होणार आहे.राञी ९ वाजता ताशा,ढोल,बॅन्डच्या गजरात छबीना,मुळा नदीपाञाजवळ शोभेची दारू उडविणे तसेच राञी १२ वाजता करमणुकीचे कार्यक्रम होणार आहेत.सोमवारी सकाळी ९ वाजता हज-या व दुपारी ४ वाजता कुस्त्यांचा जंगी हगाम्याचे आयोजन करण्यात आले आहे.खंडेराया याञा उत्सवा निमित्त होणा-या कुस्त्याच्या हगाम्यासाठी कोल्हापूर,पुणे,नगर ,सोलापूर,सातारा,सांगली या पश्चिम महाराष्ट्रातील नामवंत पैलवान हजेरी लावणार आहेत.यंदाच्या कुस्त्या हगाम्यात शंभर ते एक लाख एक्कावन्न हजार रूपयांची बक्षीसे ठेवण्यात आली आहेत.याञेत करमणुक म्हणुन ओळख असलेल्या रहाटपाळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.मंगळवारी दुपारी ४ वाजता नगर मनमाड राज्य महामार्गालगत असलेल्या आण्णासाहेब शेटे पाटील यांच्या शेतातील मैदानावर ( धसाळ पेट्रोल पंपामागे ) बैलगाडा शर्यतीचा ” भिर्रर्र “असा थरार पहावयास मिळणार आहे.गेली दहा वर्षापासून असलेली शासनाची बंदी यंदा उठल्याने राहुरीकरांना बैलगाडा शर्यती पहावयास मिळणार आहे.
श्रीखंडेराया याञा उत्सव यशस्वीतेसाठी याञा कमेटीचे अध्यक्ष जगन्नाथ भिंगारकर,उपाध्यक्ष राजेंद्र गणपत वराळे,उपाध्यक्ष अमोल अशोक तनपुरे,सचिव अशोक वामन,सहसचिव संजय नांदे,खजीनदार राजेंद्र गणपत उंडे,सहखजिनदार नयन शिंगी,पञकार राजेंद्र वाडेकर,सदाशिव शेळके,विजय भुजाडी,दत्तात्रय येवले,आबासाहेब भुजाडी,आर.आर.तनपुरे,गणेश खैरे,शिवाजी वराळे,रावसाहेब हरिश्चंद्रे,सुनील पवार,प्रतिक तनपुरे,दिलीप राका,अशोक वराळे,कांतीराम वराळे,दादासाहेब तोडमल,गोरक्षनाथ चव्हाण,
नारायण धोंगडे,विशाल बागडे,दिलीप राका,
बाळासाहेब तमनर,हरिभाऊ उंडे,भिकाजी खोबरे,
अकबर तांबोळी,गोरख साळवे,नाना शिरसाठ
सह खंडेराया महाराज याञा उत्सव कमेटीचे सदस्य प्रयत्नशील आहेत.
*चौकट – रावसाहेब यादवराव तनपुरे – अध्यक्ष श्री खंडेराया महाराज देवस्थान ट्रस्ट राहुरी – राहुरीचे ग्रामदैवत श्री खंडेराया महाराज याञा उत्सवास शंभर वर्षाची परंपरा आहे.कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मागील दोन वर्ष याञा उत्सवाची परंपरा खंडीत झाली होती.यावर्षी शासनाकडुन निर्बंध उठविण्यात आल्याने १७ ते २० एप्रिल या कालावधीत धार्मिक,सांस्कृतिक,व करमणुकीच्या भरगच्च कार्यक्रमाने राहुरीचा श्री खंडेराया महाराज याञा उत्सव साजरा होणार आहे.
राहुरीचे ग्रामदैवत श्री खंडेराया महाराज.