मयुर पटारे यांच्याकडून, आदिवासी वस्ती व दलीत वस्तीस पथदिवे स्वखर्चाने देऊन, समस्या सोडवली,
टाकळीभान येथे मयुर पटारे यांच्याकडून, आदिवासी वस्ती व दलीत वस्तीस पथदिवे स्वखर्चाने देऊन, समस्या सोडवली,
टाकळीभान येथील वार्ड नंबर ४ येथील आदिवासी वस्ती (लक्ष्मीवाडी) व वार्ड नंबर १ मधील रमाई नगर येथे पथदिवे नसल्याने या परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे या भागात लुटण्याचा व चोऱ्यांचे प्रमाणही वाढले होते. अंतर्गत रस्त्यावर पथदिवे नसल्याने छोटे मोठे अपघातही होत असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मयुर पटारे यांच्याकडे केली होती.
परिसरातील नागरिकांनी केलेल्या तक्रारीची त्वरित दखल घेत ग्रामपंचायत सदस्य मयुर पटारे यांनी स्वखर्चातून पथदिवे उपलब्ध करून दिले. त्याबद्दल नागरिकांच्या वतीने लोकसेवा विकास आघाडीचे जेष्ठ नेते संजय रणनवरे यांनी मयुर पटारे यांचे आभार मानले.
यावेळी लोकसेवा विकास आघाडीचे युवक अध्यक्ष मल्हार रणनवरे, पंकज परदेशी, मंगेश पटारे, बंडु गायकवाड, संदीप भोसले, अमोल रामटेके, प्रकाश रणनवरे, गौरव औसरमोल, आकाश रणनवरे उपस्थित होते.