जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या भ्रष्ट व्यवस्थेमुळे व्यक्तिगत लाभाच्या योजना रखडल्या. -जिल्हाध्यक्ष अनिल औताडे. …

जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या भ्रष्ट व्यवस्थेमुळे व्यक्तिगत लाभाच्या योजना रखडल्या. -जिल्हाध्यक्ष अनिल औताडे आरोप. …
अ नगर जिल्ह्यतील ग्रामिण भागातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या सर्व सामान्य जनतेसह शेतकऱ्यांच्या व्यक्तिगत लाभाच्या योजना लोकप्रतिनिधी सह जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या मनमानी -भ्रष्ट कारभारामुळे गेल्या दहा वर्ष्यापासून रखडल्या जात असल्याचे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
जि. प. व पंचायत समितीच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या व्यक्तिगत लाभाच्या योजनेअंर्तगत रोजगार हमी योजनेतील सिंचन विहीर पात्रतेसाठी लाभार्थी हा निकष असून यामध्ये कुटूंब हा निकष लावून लाभार्थी शेतकऱ्यांना डावलले जात आहे. तसेच पंतप्रधान आवास योजनेतही शासकीय अभियंते कार्यरत नसून ठेकेदार पद्धतीने अभियंते काम करत असल्याने त्यांचेकडून आवास योजनेचे कामाची पाहणी वेळेवर होत नाही.एकतर प्रस्ताव मंजूर झाले त्यावेळी स्टील, सिमेंट वाळू, मजुरी याचे दर आणि आजचे सहा सात वर्ष्यानंतरचे दरामध्ये तिप्पटपटीने तफावत निर्माण झाली आहे. यासाठी लोकप्रतिनिधीने अनुदान रक्कम वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे होते. परंतु याबाबद सर्वच पदाधिकारी अक्रियाशील असलेचे दिसून आले. सदर मंजूर असलेले अनुदान कुठल्याही व्यक्तिगत लाभाच्या योजनेत पुरत नाही. आवास योजनेत शासनाकडून लाभार्थ्यांना घराचे बांधकाम सुरु करण्यासाठी लोकन्यालयाच्या नोटिसा पाठवल्या. लोकांनी योजनेचा लाभ घेणेसाठी अडीअडचणीत घराचे बांधकाम चालु केले परंतु पंचायत समितीच्या ठेकेदारीवर कार्यरत असलेल्या अभियंत्यांकडून दोन ते तीन महिने कामाची पाहणी होत नाही. लाभार्थ्यांना वारंवार पंचायत समितीत चकरा मारण्याची वेळ येत आहे. संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांकडून याबाबाद परीक्षण होते की नाही असा प्रश्न लाभार्थ्यांना पडत आहे. ग्रामिण भागातील नागरिकांनी शौचालये बांधूनही अधिकाऱ्याच्या भ्रष्ट प्रवृत्तीमुळे अनुदानाचे प्रस्ताव देऊनही पाच -सहा वर्ष्यापासून अनुदानही मिळाले नाही. आज रोजी सदर बांधकाम जुने असलेचे शेरे मारून अनुदानापासून वंचित ठेवले जात आहे. हा सर्व प्रकार जिल्ह्यातील सर्वच पंचायत समित्यांमध्ये चालु आहे. याबाबद जि. प -पंचायत समितीतील अधिकार्यांसह लोकप्रतिनिधीही असंवेदलशील असलेचे दिसून आले.त्यांचे ध्येय फक्त तडजोडी आघाडया करून सत्ता मिळवाच्या त्यामध्ये साखर कारखाना एकाला, बाजार समिती दुसऱ्याला, पंचायत समिती-जि. प. तिसऱ्याला नगर पालिका चौथ्याला अश्या प्रकारे संस्था खाजगी जहागिऱ्या असल्यासारख्या वाटून घेऊन लुटून खाण्याचा सपाटा चालु आहे. त्यामुळे अधिकाऱ्यावर कुठलाही वचक राहिला नाही. ह्या सर्व संस्था ग्रामिण भागाशी निगडित असलेने शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याच्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुका शेतकरी संघटना बाजार समित्या, पंचायत समित्या व जि. प. शेतकऱ्यांना व शेतकरी विचाराच्या संघटनांना बरोबर घेऊन पूर्ण ताकदीनिशी लढवणार असलेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी सांगितले.