म्हाडा’ तील ‘त्या’ हाऊसिंग सोसायटीविरोधातील तक्रारींची दखल. सहाय्यक निबंधकाकडून व्यवस्थापनाला नोटीस.
म्हाडा’ तील ‘त्या’ हाऊसिंग सोसायटीविरोधातील तक्रारींची दखल.
सहाय्यक निबंधकाकडून व्यवस्थापनाला नोटीस.
शहरातील म्हाडा कॉलनीतील श्रीदत्त म्हाडा हौसिंग को-आॅपरेटीव्ह संस्थेच्या हंगामी व्यवस्थापन समिती पदाधिकाºयांच्या अनियमित कारभाराविरोधात सभासदांनी दाखल केलेल्या तक्रारींची सहाय्यक निबंधकांनी दखल घेतली असून सोसायटी व्यवस्थापनाला नोटीस बजावली आहे.
श्रीरामपूर शहरातील म्हाडा गृहप्रकल्पातील श्रीदत्त म्हाडा हौसिंग सोसायटीच्या सभासदांनी नुकताच सहाय्यक निबंधकांना तक्रार अर्ज दिला. त्यात म्हटले होते, की संस्थेचा कारभार अनियमित पद्धतीने सुरू असून संस्था स्थापन होऊन वर्ष झाले, तरी अजून सभासदांची सार्वत्रिक बैठक घेतली गेलेली नाही. स्वत: घेतलेले निर्णय सदनिकाधारकांवर लादण्याचे काम मुख्य प्रवर्तक करत आहेत. यासंदर्भात तोंडी, लेखी तक्रार करूनही प्रतिसाद दिला जात नाही,तसेच संस्थेच्या नोंदणी खर्चात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा संशय तक्रार अर्जात व्यक्त केला आहे. तसेच नव्याने होणाºया सभासदांकडून अतिरिक्त पैशााची मागणी होत असल्याचेही तक्रार अर्जात नमूद आहे. संस्थेचे पदाधिकारी कुठल्याही अजेंड्याविना बेकायदेशीर बैठक घेऊन समाधानकारक माहिती न देता सभासदांची दिशाभूल करत आहे. हंगामी समितीची मुदत जुलै २०२२ मध्ये संपत असतानाही जमा-खर्च देण्यास व नवीन पदाधिकाºयांची निवड करण्यात पदाधिकारी चालढकल करत आहेत, आदी तक्रारींचे निवेदन सहाय्यक निबंधक एस. पी. रुद्राक्ष यांना सभासदांच्या वतीने देण्यात आले होते. या तक्रारीची दखल सहाय्यक निबंधक यांनी घेतली असून संस्थेचे अध्यक्ष, सचिव यांना तक्रार अर्जात नमूद केलेल्या मुद्दयांबाबत सविस्तर अहवाल आवश्यक त्या कागदपत्रांसह कार्यालयात सादर करण्याची नोटीस बजावली आहे.
————————
संचालक मंडळ अडचणीत येणार?
सभासदांकडून घेतली गेलेली संपूर्ण रक्कम संस्था स्थापन करण्यासाठी खर्च झाल्याचे मुख्य प्रवतर्क सांगत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वेळोवेळी मागणी करूनही या खर्चाचा तपशिल मुख्य प्रवतर्क देत नाही. यात चौकशीअंती गैरव्यवहार झाल्याचे सिद्ध झाल्यास संपूर्ण संचालक मंडळ अडचणीत येण्याची शक्यता आहे, असे जिल्ह्यातील इतर काही संस्थांच्या संचालक मंडळाबाबत झालेले असून त्यांच्या मालमत्तांवर टाच आल्याचीही उदाहरणे आहेत.