आरपीआय च्या श्रीगोंदा शहराध्यक्ष पदी युवराज घोडके…

आरपीआय च्या श्रीगोंदा शहराध्यक्ष पदी युवराज घोडके…
शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे युवराज घोडके यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या श्रीगोंदा शहराध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीने आरपीआय गटात नवचैतन्य निर्माण झाले आहे.
युवराज घोडके यांनी मागील सांगली कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदत पाठवण्याचे कार्य केले होते तसेच कोरोना काळात रुग्णांना देखील मोलाची मदत केली होती.गरजूंना किराणा किट चे देखील वाटप मित्र मंडळींच्या सहकार्याने केले होते
या सामाजिक कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशावरून आणि संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, विभागीय प्रमुख भिमाभाऊ बागुल व जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या पुढाकारातून श्रीगोंदा शहराध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल आनंद शिंदे, राजू काळे, संदीप ससाणे, चेतन ससाणे, शिवाजी घोडके, भाऊसाहेब घोडके, शुभम घोडके, संकेत घोडके विशाल जुंजाळ, मयूर घोडके, अक्षय घोडके, संकेत घोडके, अक्षय आठवले, तुषार जगताप जॉन घोडके, साहिल घोडके, स्वप्नील घोडके, केतन घोडके, संजू घोडके, शिवा घोडके, योगेश घोडके, आदींनी अभिनंदन केले.