सागर बेग यांना श्रीरामपूर विधानसभा मधून उदंड प्रतिसाद.पाथरे येथील सभा याचे उदाहरण.
अपक्ष उमेदवार सागर बेग यांना श्रीरामपूर विधानसभा मधून उदंड प्रतिसाद.
श्रीरामपूर(प्रतिनिधी):- ही निवडणूक नसून फतवा विरुद्ध भगवा अशी धर्माची लढाई आहे.काँग्रेसच्या व्यासपिठावर जिहादी प्रवृत्तीचा मुसलमान हिंदूं धर्मियांची टिंगल उडवतो आणि उमेदवार त्याचे टाळ्या वाजवून समर्थन करतो ही हिंदू धर्मियांची थट्टाच असून अशा प्रवृत्तींना गाडा असे परखड मत अपक्ष उमेदवार सागर बेग यांनी राहुरी तालुक्यातील पाथरे गावात हजारोंच्या संख्येने उपस्थित झालेल्या भरगच्च सभेत मांडले आहेत.*
आपल्या अर्ध्या तासाच्या घणाघाती भाषणात ते पुढे म्हणाले की,आपल्याला डोक्यावरील टोपली साठी मतदान करायचे की कपाळावरील टिळा वाचवण्यासाठी मतदान करायचे आहे यावर आता शांत डोक्याने विचार करायची वेळ आली आहे.शत्रू त्याच्या मनसुब्यात काँग्रेसच्या पाठबळावर आजपर्यंत यशस्वी होत आलेला आहे.यापुढे असे मनसुबे ठेवून राहणाऱ्यांचे खुबे मोडण्याची ताकद हिंदू धर्मियांच्यात तयार होणे आज गरजेचे आहे.राजकीय स्वार्थासाठी मतदारांना व्यसनाधीन करून लालच देऊन विरोधक प्रचारसभा घेत असतील पण आज पाथरे गावात या सभेला आलेल्या माझ्या माता, भगिनी,बंधूंनीच माझी निवडणूक हाती घेतली आहे.त्यांचा भाऊ,मुलगा समजूनच प्रत्येक मतदार आज कामाला लागला त्या कामाची परतफेड मी माझ्या कामातून दाखवून देईल असा विश्वास यावेळी सागर बेग यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिल्याने प्रचंड टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत करण्यात आले.
काँग्रेसच्या श्रीरामपूरातील मुस्लिम मोहलल्यात झालेल्या प्रचार सभेत हिंदू धर्मियांची मने दुखवले जाईल असे एका जीहाद्याने केलेले वक्तव्य उमेदवार सागर बेग यांनी मोबाईलवरून उपस्थितांना ऐकवल्याने घोषणा देऊन अशा अपप्रवृत्तीचा यावेळी निषेध करण्यात आला.पाथरे गावातील वयस्कर ग्रामस्थ व बाबरी पाडणारे प्रभू श्रीराम भक्त कारसेवक सखाहरी महाराज जाधव,बाबासाहेब नाईक,अप्पासाहेब जाधव,बाळासाहेब पवार व ज्ञानेश्वर कलंके यांनी या सभेस विशेष उपस्थिती दाखवल्याने सभेला महत्व आले आहे.या कारसेवकांची सभेला उपस्थिती म्हणजे प्रभू श्रीरामांचा आशीर्वादच समजला जात आहे पाथरे गावातून बेग यांना मोठ्या मतांनी मताधिक्य देण्याचा यावेळी ग्रामस्थांनी निर्णय घेतला आहे.गाव तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जाणार असून पाथरे गावकऱ्यांनी पुतळ्याची केलेली मागणी यावेळी सागर बेग यांनी मंजूर करत पुतळा बसवण्याचा शब्द ग्रामस्थांना दिल्याने ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात त्या निर्णयाचे स्वागत केले.तर छत्रपतींच्याच राज्यात पुतळा बसवण्यासाठी परवानगी घ्यावी लागते ही शरमेची बाब असल्याचे बेग यांनी यावर नाराजी व्यक्त केली.
याप्रसंगी शंकरराव जाधव,विनोद म्हसे,अप्पासाहेब जाधव,कल्याण जाधव,पप्पू भाऊ जासूद हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
कु.मैथिली दत्तात्रय सूर्यवंशी या महाविद्यालयीन मुलीने केलेले भाषण उपस्थितांचे मन जिंकणारे ठरले तर पाथरेकरांना मैथिलीने सागर बेग यांना मतदान करण्यासाठी दिलेली शपथ लक्षणीय अशी ठरली.