अडबंगनाथ देवस्थानच्या पालखी व दिंडीचे बेलापुर ग्रामस्थांच्या वतीने भव्य स्वागत
अडबंगनाथ देवस्थानच्या पालखी व दिंडीचे बेलापुर ग्रामस्थांच्या वतीने भव्य स्वागत
बेलापुर (प्रतिनिधी )-कोरोनाचे संकट टळू दे भरपूर पाऊस पडून बळीराजा सुखी होवो असे मनोभावे साकडे पाडूरंगाला घालणार असल्याचे अडबंगनाथ देवस्थानचे मठाधिपती अरुणगिरीजी महाराज यांनी सांगितले अडबंगनाथ देवस्थानचे मठाधिपती महंत अरुणगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या पालखी व दिंडीचे यश ट्रेलर व बेलापुर ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले होते त्या वेळी बोलताना अरुणगिरीजी महाराज म्हणाले की या दिंडीचे हे बारावे वर्ष असुन अतिशय शिस्तप्रिय दिंडी म्हणून या दिंडीची ओळख आहे .सर्व वारकऱ्यांना पांढरा पोषाख डोक्यावर टोपी असा गणवेश असुन पुरुष व महीला वारकरी स्वतंत्र वारीत चालत असतात कोरोनामुळे दोन वर्ष पायी दिंडी काढता आली नाही त्यामुळे आता वारकरी विठ्ठल पांडूरंगाच्या भेटीला आसुसलेला आहे .पांडूरंग सर्व भक्तांच्या ईच्छा पूर्ण करतील असा विश्वासही त्यांनी बोलुन दाखविला या वेळी मा ,जि प सदस्य शरद नवले यांनी देवस्थानला दिलेल्या निधीचा आवर्जुन उल्लेख करुन संस्थानला आणखी निधीची गरज असल्याचेही अरुणगिरीजी महाराज म्हणाले या वेळी मा.जि प सदस्य शरद नवले उपसरपंच अभिषेक खंडागळे बेलापुर सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले माजी सरपंच भरत साळूंके खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड प्रकाश कुऱ्हे पत्रकार’ देविदास देसाई नवनाथ कुताळ यश ट्रेलरचे मालक उल्हास कुताळ कुंदन कुताळ वसंतराव कुताळ रविंद्र कुताळ दादासाहेब कुताळ विलास मेहेत्रे कन्हैय्या कुताळ यश कुताळ प्रकाश कुऱ्हे भाऊसाहेब वाबळे शशिकांत नवले चंद्रकांत नवले रफीक बागवान आदिंनी पालखीचे स्वागत केले. बेलापुर ग्रामपंचायतीच्या वतीने पालखीचे स्वागत करून ह.भ.प.अरूणगिरीजी महाराजांचा सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले,उपसरपंच अभिषेक खंडागळे, ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख,रमेश अमोलिक,दिलीप दायमा,शिवदास दायमा, प्रकाश कु-हे,सचिन वाघ,समीर जहागिरदार,राजेंद्र कुताळ,नितीन नवले, सुभाष राशिनकर,कुंदन कुताळ, आदी उपस्थित होते