ब्रेकिंगमहाराष्ट्र
*12 डिसें.गेवराई शहर कडकडीत बंद*
*12 डिसें.गेवराई शहर कडकडीत बंद*
राज्यपाल भगतसिंग कोशारी आणि सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत अपमानास्पद भाषेच्या वक्तव्याच्या विरोधात गेवराई शहरातील सर्व धर्मीय शिवप्रेमी कडकडीत बंद ठेवून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सोमवार दि.12 डिसेंबर रोजी सकाळी ठिक 10 वाजता भव्य निषेध रॅली शास्त्री चौक, संपूर्ण मिरवणूक मार्ग ( माळी गल्ली, मोमीनपुरा, मेन रोड, भवानी पेठ, चिंतेश्वर गल्ली ) मार्गे तहसील कार्यालयासमोर शिवप्रेमी मावळ्यांच्या तीव्र भावना व्यक्त करून तहसीलदार साहेबांना लेखी निवेदन दिले जाईल.
तरी सर्व व्यापारी वर्गाने सोमवार दि. 12 डिसेंबर रोजी आपले व्यवहार बंद ठेवून या ” निषेध रॅली ” मध्ये सहभागी व्हावे व सर्व धर्मीय शिवप्रेमी मावळ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन गेवराईतील सर्व धर्मीय शिवप्रेमी मावळ्यांनी केले आहे.