ब्रेकिंग
कुरणवाडीत बिबटयाचा मेंढयावर हल्ला.

कुरणवाडीत बिबटयाचा मेंढयावर हल्ला.
राहुरी तालुक्यातील कुरणवाडी येथील शेतकरी राहुल केदारी यांच्या मेंढयावर बिबटयानी खाल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असुन यावेळी जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे यांनी कुरणवाडी येथे शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी करून नुकसान भरपाई मिळणेबाबत मदत करू असे म्हटले असून यावेळी पोलीस पाटील केदारी,ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब वडितके,विजय बड़ें, सजेंराव केदारी आदि या वेळी उपस्थित होते. घटनास्थळी वनविभागाचे अधिका-यांनी पंचनामा केला.
शेतकऱ्यांनी वनविभागाचे अधिका-यांना या परिसरात बिबट्या चा प्रादुर्भाव वाढत असल्याबद्दल त्यांनी भिती वाढत असल्या मुळे खबरदारी म्हणून या परिसरात लवकरात लवकर पिंजरा लावण्यात यावा ही मागणी करण्यात आली.
राहुरी तालुका
अशोक मंडलिक