ब्रेकिंग
फाट्याजवळ युवकाचा जागीच मृत्यू”
फाट्याजवळ युवकाचा जागीच मृत्यू”
जिल्ह्यामध्ये वाहनांच्या अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. वाहनाच्या बेदरकारपणे चालवण्याने अनेक वेळा भीषण अपघात घडतात आणि जीवितहानी देखील होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक वेळा दुचाकीस्वार एवढया भन्नाट वेगाने गाडी हाकतात कि, त्यावरील ताबा सुटून वाहनांना देखील अपघात झाल्याने नुकसान पोहोचते.
सविस्तर वृत्त असे की भरधाव वेगाने जाणार्या दुचाकीवरील झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा शनिवारी सकाळी 11 च्या सुमारास जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. ताराचंद माणिक माळी वय 38, रा. वडगाव ढोक ता गेवराई जि. बीड असे त्या मयत दुचाकीस्वराचे नाव आहे. ही घटना 16 जुलै रोजी सोलापूर धुळे महामार्ग उमापुर फाटा येथे घडली असुन सदर दुचाकी स्वराला स्थानिकांनी उपजिल्हा रुग्णालय गेवराई येथे हलवले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे.