उपसरपंच कानोबा खंडागळे यांनी कामाची पाहणी करून निकृष्ट दर्जाचे कामचा पाया टिकावाने खांदुन काढला

श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान उपसरपंच कानोबा खंडागळे यांनी कामाची पाहणी करून निकृष्ट दर्जाचे कामचा पाया टिकावाने खांदुन काढला
टाकळीभान येथे प्रभाग क्रमांक : 3 मधील कृषी विभागाच्या कार्यालयासमोर – पशु वैद्यकीय दवाखान्याच्या पाठीमागील बाजूच्या भिंतीलगत भाजी मंडई पत्रा-शेड चे काम सुरु असून या शेडच्या पायाच्या कामाची पाहणी केली, तसेच वार्ड क्रमांक सहा येथील शौचालयाची पाहणी केली, यामध्ये त्यांनी ठेकेदाराकडून निष्कृष्ट काम झाल्याचे सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून व्हायरल केले. या भाजी मंडई साठी एक पाखी पत्रा शेड – ओटा + फर्शी – पत्रा शेड समोर पेव्हिंग ब्लाॅक व लाईटची व्यवस्था अशा स्वरुपात काम होणार असून सदर पत्रा शेड साठी पाया घेण्याचे काम ग्रामपंचायत ने ठेकेदार सुभाष मांजरे यांना दिले होते परंतु उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी पाहणी केली असता सदर काम निकृष्ट असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तो स्वतः टिकावाने खणला… त्यासाठी लागणारे मटेरियल निष्कृष्ट वापरून तो लगेच खनला गेला , त्यामुळे तो पाया काढून टाकण्यात आला तसेच याप्रसंगी
प्रभाग क्रमांक : 6 मधील{ लक्ष्मीवाडी } परिसरातील शौचालय कामाची उपसरपंच कान्हा खंडागळे पाहणी केली यामध्येही त्यांनी शौचालय बांधकामाबद्दल बांधकामासाठी वापरलेले मटेरियल, कामाबाबत सदर ठेकेदार सुभाष मांजरे यांना प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी बोलावून सुनावले. सदर ठेकेदार गेल्या पंधरा-वीस वर्षापासून टाकळीभान ग्रामपंचायतचे विविध कामांचे ठेके घेतात, व हीच मंडळी सदस्य व पदाधिकारी आहेत, या अगोदर ही निकृष्ट कामे कोणाच्या लक्षात आले नाही याबद्दल ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
ठेकेदार ने केलेले कामकाज कोणत्या प्रकारच्या आहे हे ठरवण्याचा अधिकार पंचायत समितीच्या इंजिनियर यांना आहे, तसेच निष्कृष्ट कामास आमचा विरोध असून चांगले व दर्जेदार काम होणे अपेक्षित आहे. त्याची शहानिशा पंचायत समिती अधिकारी यांनी करावी… सरपंच अर्चनाताई रणनवरे…
मंडई पत्रा शेडचे निकृष्ट काम टिकाऊच्या साह्याने खानताना उपसरपंच कान्हा खंडागळे….