वांगी वाळू डेपोचे महसूल मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन संपन्न
महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेने जनसामान्यांना माफक दरात वाळू उपलब्ध तसेच अवैध्य वाळू रोखण्यासाठी शासनाने वाळू डेपो सुरू केले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे काम यशस्वीरित्याच चालू असून याचाच एक हिस्सा श्रीरामपूर तालुक्यातील वांगी या ठिकाणी वाळू डेपो सुरू करण्यात आला असून शासकीय देखरेखीखाली याचे काम चालू आहे.
आज राज्याची महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या डेपोचे ऑनलाईन उद्घाटन करून सर्वसामान्य सहाशे रुपये ब्रास प्रमाणे वाळू उपलब्ध करून दिल्याने बांधकाम धारकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहावयास मिळत आह.
वांगी खुर्द व वांगी बुद्रुक या ठिकाणच्या वाळू घाटातून शासकीय डेपोसाठी ठेकेदार शुभम जगताप यांनी या निवेद्येची प्रक्रिया घेत 14500 म्हणजेच 65 हजार टन वाळू नदीपात्रातून डेपो मध्ये उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय नियमाप्रमाणे काम चालू केलेले आहे. अशी माहिती यावेळी नायब तहसीलदार वाकचौरे यांनी बोलताना दिली आतापर्यंत या डेपोमध्ये 1800 ब्रास वाळू साठा करण्यात आल्याची ही यावेळी त्यांनी सांगितले.
घरकुल व शौचालय साठी या डेपोतून मोफत वाळू तसेच इतर व्यक्तींना 600 रुपये ब्रास प्रमाणे वाळू उपलब्ध होणार असल्याने ज्यांना वाळू पाहिजे असेल त्यांनी आधार कार्ड व रेशन कार्ड घेऊन तहसील कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन नायब तहसीलदार वाकचौरे यांनी नागरिकांना केले.
या उद्घाटन प्रसंगी ज्यांनी वाळू डेपो साठी जागा उपलब्ध करून दिली असे मयत धनंजय माने यांना सर्वानुमते एक मिनिट शांत उभे राहून नायब तहसीलदार वाकचौरे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
नामदार विखे पाटील यांनी वाळू डेपो चालू करून सर्वसामान्य नागरिकांचे होणारी गैरसोय व वाळू धंद्यात होणारी लुटमार तसेच गुन्हेगारी वाढत असल्याची ओळखून याला आळा घातल्याने विखे साहेबांनी दूरदृष्टीने उचललेले पाऊल यशस्वी झाल्याने सर्व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे वाळू डेपोच्या निर्णयाने असा निर्णय घेऊन यशस्वी झाल्याचे समाधान मनात आहे.
भाजपा तालुका अध्यक्ष दीपक अण्णा पटारे
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष दीपक अण्णा पटारे, नायब तहसीलदार वाकचौरे, मंडल अधिकारी शिंदे मॅडम, तलाठी चितळकर, तेलतुंबडे, इतर महसूल कर्मचारी, मार्केट कमिटी माजी सभापती नानासाहेब पवार, नानासाहेब तनपुरे, बाबासाहेब माने, संजय भिसे, काकासाहेब साळे ,आप्पासाहेब माने, सुभाष पठारे, लक्ष्मण पवार, निवृत्ती बडाख, रवी पाटील, महेंद्र पठारे, सुधीर खपके, बबन आहेर, सरपंच ज्ञानेश्वर बिडगर, ज्ञानेश्वर लकडे, ठेकेदार शुभम जगताप, प्रसाद सातोरे, ऋषिकेश जगताप, रोहन अवताडे, अमोल अवताडे, गणेश बडाख, सुजित बडाख, सागर धनवटे, महेश खराडे, फिरोज पठाण, शशी धीवर, गजानन राऊत, सागर मलिक आदी उपस्थित होते
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा