ब्रेकिंगमहाराष्ट्र

ग्रामपंचायत हद्दीत नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत गल्लीबोळांमध्ये जेसीबी ने खड्डे खोदून पाईप बसवण्याचे कामखड्डे अर्धवट स्थितीत असल्याने नागरिकांना मोठा त्रास

ग्रामपंचायत हद्दीत नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत गल्लीबोळांमध्ये जेसीबी ने खड्डे खोदून पाईप बसवण्याचे कामखड्डे अर्धवट स्थितीत असल्याने नागरिकांना मोठा त्रास

 

राहाता तालुक्यातील लोहगाव ग्रामपंचायत हद्दीत नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत विविध ठिकाणी रस्त्यांवर, गल्लीबोळांमध्ये जेसीबी ने खड्डे खोदून पाईप बसवण्याचे काम सुरू असले तरी ते काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी हे खड्डे अर्धवट स्थितीत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे .याकडे संबंधित विभाग व ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष होत असून त्याचा त्रास मात्र नागरिकांना सोसावा लागत आहे. या कामाचे नियोजन नसल्याने व संथ गतीने‌‌ हे काम सुरू असल्यामुळे येथील नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

     राहाता तालुक्यातील लोहगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये सध्या महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणाच्या अंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजना राबवली जात असून या योजनेअंतर्गत गावामध्ये ठिकठिकाणी जेसीबी ने खड्डे खोदून नवीन पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू आहे . गावात अनेक ठिकाणी छोटे रस्ते, गल्लीबोळाआहेत त्यातच मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे मात्र पदावर बसलेले याकडे मात्र सोयीस्कर काना डोळा करत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे . तेथे खोदाई करून नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र हे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे . त्यामुळे अनेक भागात खड्डे खोदून ठेवले मात्र पुढील पाईप लाईन टाकून ते बुजवण्याचे काम लवकर होत नसल्यामुळे गावामध्ये अनेक ठिकाणी नागरिकांना येण्या-जाण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे .खड्डे खोदून ठेवले मात्र हे काम ताबडतोब करणे गरजेचे असतानाही ते झटपट होत नाही.त्यामुळे नागरिकांना येण्या जाण्यास मोठी कसरत करावी लागत आहे.एखाद्या रुग्णांस दवाखान्यात न्यायचे ठरले तर रुग्णवाहिका जाणे मुश्किल आहे. हे काम करत असताना व नवीन पाईपलाईन साठी खड्डे खोदत असताना जुनी पाईपलाईन फुटल्यामुळे ऐन उन्हाळ्यात काही भागात पाणीपुरवठाही नागरिकांना होत‌ नाही. अनेक ठिकाणी हे खड्डे घेतले गेले तेही वर खाली आहेत. तेही व्यवस्थित घेण्यात आले नाहीत. या खड्ड्यांमध्ये नवीन पाईपलाईन टाकून ते ताबडतोब जेसीबीने मातीने बुजवणे गरजेचे होते. मात्र खड्डे झटपट घेतले मात्र पुढील बुजवण्याचे काम संथ गतीने सुरू आहे.त्यामुळे त्या त्या भागातील रहिवाशांना याचा मोठा त्रास होत आहे. गेल्या चार-पाच दिवसापासून पिण्याचे पाणी नाही. येण्या जाण्यास मोठा अडथळा निर्माण झाला आहे. रुग्णांना दवाखान्यात जाण्यासाठी घरातून मेन डांबरी रस्त्यावर उचलून आणावे लागत आहे. लहान मुले या खड्ड्यात पडून किरकोळ जखमी होत आहेत. अशी परिस्थिती असताना हे काम लवकर पूर्ण करण्यासाठी या महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणाच्या कामाकडे किंवा ठेकेदाराकडे कोणाचे लक्ष नाही. ग्रामपंचायतचे पदाधिकारी ही त्याकडे कानाडोळा करीत आहेत. संबंधित प्रत्येक वार्डामध्ये हे काम सुरू आहे .व चार-पाच दिवसापासून अर्धवट स्थितीत आहे. काही ठिकाणी संथ गतीने सुरू आहे.मात्र तेथील ग्रामपंचायत सदस्य ही त्याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे रहिवाशांमध्ये मोठी नाराजी आहे.

नवीन वाढीव पाणीपुरवठा योजना ही चांगली गोष्ट आहे. मात्र हे काम झटपट करणे महत्त्वाचे आहे .कारण गावांमध्ये छोटे छोटे रस्ते ,छोट्या गल्लीबोळा असताना त्या खोदून ठेवल्या. त्या चार-पाच दिवसापासून तशाच उघड्या आहेत. बुजवल्या गेल्या नाहीत. रिकामी अगदी संथ गतीने सुरू आहेत .मुळातच एका एका भागातील‌ हे काम ठेकेदाराने खड्डे खोदून प्रथम ते पूर्ण केल्यानंतर दुसरीकडे खड्डे खोदून काम करणे गरजेचे होते.मात्र सर्वच ठिकाणी झटपट खोदून ठेवले व पुढील काम‌‌ अतिशय संथ गतीने सुरू आहे.त्यामुळे गावातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधित विभागाने याकडे त्वरित लक्ष द्यावे नागरिकांना या खोदून ठेवलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या खड्ड्यांमुळे सध्या मोठा त्रास होत आहे . जुनी पाईपलाईन फुटल्यामुळे अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी ऐन उन्हाळ्यात मिळत नाही. त्यामुळे या नवीन पाईपलाईन चे काम त्वरित पूर्ण करावे. यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी व अधिकारी यांनी संबंधित ठेकेदाराला किंवा कर्मचाऱ्यांना तशी ताकीद द्यावी. अशी मागणी ही येथील ग्रामस्थांनी, विशेषता महिला वर्गामधून होत आहे.

Rate this post
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे