नगर – मनमाड महामार्गाचा सुरक्षाप्रश्नच ऐरणीवर, महामार्ग पथकाचेही दुर्लक्ष

नगर – मनमाड महामार्गाचा सुरक्षाप्रश्नच ऐरणीवर, महामार्ग पथकाचेही दुर्लक्ष
सध्या नगर-मनमाड महामार्गाचे मजबुतीकरण सुरू आहे ठेकेदार कंपनीने महामार्गावर राहुरी ते राहाता या दरम्यान विविध ठिकाणी खड्डे खोदून ठेवले आहेत रात्री-अपरात्री लहानमोठे अपघात घडून निष्पापांना हकनाक आपल्या जीवावर संक्रांत ओढवून घ्यावी लागत आहे बरोबरच दुचाकीस्वारांना लुटणाऱ्या घटनाही घडत असताना मात्र महामार्गावर अपघात समयी मदत करणारे महामार्ग पोलीस पथक सध्या कार्यरत नसल्याचे एकंदर चित्र पहावयास मिळत आहे
नगर-मनमाड या राज्य महामार्गाचे मजबुतीकरणाबरोबरच लगतच पाणी वाहून जाण्यासाठी दुभाजक पुलांंची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत यासाठी मोठमोठे खड्डे खोदण्यात आले आहेत मात्र काही ठिकाणी त्या खड्ड्याभोवती सुचना फलक लावलेले नाहीत यामुळे अनेक छोटेमोठे अपघात घडत आहेत नुकताच गुहापाटानजीक दुचाकीस्वार या खड्ड्यात कोसळला स्थानिक नागरिक व पत्रकारांच्या सतर्कतेमुळे त्याला औषधोपचार मिळाले मात्र त्याला अपंगत्व आल्याची घटना ताजी असताना ठेकेदार कंपनीबरोबरच महामार्गाची सुरक्षा करणारे बाभळेश्वर येथील सुरक्षा पथक कार्यरत होताना दिसत नाही मागील महिन्यात एकेरी केलेल्या रस्त्यावरून वाहतूक सोडली असताना गुहापाटाजवळ लक्झरी बस व कारचा अपघात होवून हकनाक तीन भाविकांना आपला जीव गमवावा लागला होता
या महामार्गाची अवस्था प्रचंड खालावली असून खड्डे चुकविण्याच्या नादात आजही दुचाकीस्वारांचे अपघात घडत आहेत सायंकाळ नंतर अचानक एकेरी वाहतूक केली जात असून या एकेरी वाहतुकीसंदर्भात महामार्ग पोलिसांकडून कोणतीही ठोस माहिती मिळत नाही कोल्हारच्या पुलावर वाहतूक ठप्प चा पाढा सर्वश्रुत झाला आहे अपघात समयी तात्काळ दाखल होणारे महामार्ग पथक आता फक्त रस्ता सुरक्षा अभियानात पहावयास मिळत आहे तर खड्डेयुक्त रस्त्यावर सकाळी १० नंतर पिंपरी निर्मळ येथील बंद पडलेल्या टोलनाका तर चिंचोली परिसरातील महामार्गावर पहावयास मिळत आहे
नुकतेच महात्मा फुले विद्यापीठाच्या कार्यक्रमानिमित्ताने राज्यपालांच्या उपस्थितीत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री यांनी या महामार्गाचे तातडीने अधुनिकीकरण होवून शिर्डी व शिंगणापूर येथे येणाऱ्या भाविकांना सुलभ सेवा देण्यासाठी अधिकाऱ्यांना सुचित केले होते मात्र नेहमीप्रमाणेच ‘अधिकारी स्वस्थ नि प्रजा त्रस्त’ अशी म्हणण्याची वेळ वाहनचालक, प्रवासी व स्थानिक नागरिकांवर आली आहे.
राहुरी तालुका
अशोक मंडलिक