मानोरी परिसरात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
मानोरी परिसरात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
राहुरी तालुक्यातील मानोरी परिसरात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या तीन दिवसापासून सुरू असलेल्या या अमृत महोत्सवानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय व मानोरी विविध कार्यकारी सोसायटी या कार्यालयावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली तसेच परिसरामध्ये विविध ठिकाणी शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी अंबिका माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद शाळा मानोरी या विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली या प्रभात फेरीत भारतीय स्वातंत्र्याचा विजय असो वंदे मातरम अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला आज स्वातंत्र्य दिनानिमित्त मानोरी ग्रामपंचायतचे ध्वजारोहण लोकनियुक्त सरपंच हाजी अब्बास भाई शेख दयावान तसेच मानोरी विविध कार्यकारी सोसायटी चे विद्यमान चेअरमन शरदराव पाटील पोटे मानोरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उपसरपंच शकुंतला ताई आढाव अंबिका माध्यमिक विद्यालय येथे डॉ तनपुरे कारखान्याचे संचालक उत्तमराव पा आढाव यांच्या हस्ते पार पडले यावेळी ह भ प शंभू बाबा गोसावी कचरू नाना आढाव माजी सैनिक चंद्रकांत पोटे डॉ तनपुरे कारखान्याचे माजी संचालक निवृत्ती पाटील आढाव मा उपसभापती रवींद्र आढाव रेणुका माता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आढाव तंटामुक्तीचे अध्यक्ष बाजीराव पाटील आढाव मानोरी विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय गुंजाळ सर विटनोर सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पाखरे सर संचालक नवनाथ थोरात संचालक भास्कर भिंगारे संचालक रायभान पाटील आढाव युवा नेते पोपटराव पोटे बापूसाहेब वाघ भाऊसाहेब आढाव अण्णासाहेब तोडमल संजय डोंगरे मनोज खुळे शामा आढाव रवींद्र नी आढाव ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक अंबिका माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते