बेलापूर बु ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आडमुठे धोरना मुळे वेतनवाढीची चर्चा फिसकटली
बेलापूर बु ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आडमुठे धोरना मुळे वेतनवाढीची चर्चा फिसकटली
बेलापुर (प्रतिनिधी )- ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पगारवाढ करण्यात यावी प्राँव्हीडंट फंडाची रक्कम त्वरीत अदा करण्यात यावी या मागणीसाठी बेलापुर ग्रामपंचायत कर्मचारी धरणे आंदोलन सुरु केले असुन गटविकास अधिकारी अनंत परदेशी यांच्यासमोर कामगारांनी टोकाची भुमीका घेतल्यामुळे बोलणी फिसकटली वेतनवाढ करण्यात यावी पंधरा महीन्यापासुन थकीत असलेली प्राँव्हीडंट फंडाची रक्कम तातडीने जमा करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य श्रमीक संघाचे काँ.जिवन सुरुडे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरु केलेले आहे .आंदोलनाचा आज दुसरा दिवस होता .कामगार व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यात तोडगा काढण्यासाठी गटविकास अधिकारी अनंत परदेशी हे ग्रामपंचायत कार्यालयात आले होते ते येण्यापुर्वी जि प सदस्य शदर नवले, भाजपाचे जेष्ठ नेते,सुनिल मुथा देविदास देसाई प्रफुल्ल डावरे,गावकरी पतसंस्थे चे चेअरमन साहेबराव वाबळे,ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख, हाजी इस्माईल शेख, पुरुषोत्तम भराटे,मोहसीन सय्यद,प्रभात कु-हे, शफिक बागवान, विशाल आंबेकर,शफिक आतार,जब्बार आतार यांनी सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे व कामगारांचे नेते जिवन सुरुडे यांच्याशी चर्चा करुन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी ८००रुपये व २००रुपये अशी एक हजार रुपये पगारवाढ देण्याचे कबुल केले मात्र कामगार हे १२००रुपये पगारवाढ करण्यावर ठाम राहीले त्यामुळे बैठकीत एकमत होवु शकले नाही त्यामुळे बोलणी फिसकटली अन कर्मचारी आंदोलन सुरुच ठेवण्यावर ठाम राहीले ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी देखील या पुढे आपण पगारवाढ देवु शकत नसल्याचे स्पष्ट केले त्या वेळी बोलताना उपसरपंच अभिषेक खंडागळे म्हणाले की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या पगारावर ३५% खर्च करण्याची तरतुद असतानाही बेलापुर ग्रामपंचायत पगारावर ७०% खर्च करते ५०लाख उत्पन्न असुन ३६ लाख रुपये त्याकरीता आगोदरच पगारावर खर्च होत आहे आणखी खर्ख वाढला तर इतर कामे करणे अवघड होईल हे सर्व ग्रामस्थाच्या नजरेसा आणून दिले आहे .८००+ २०० पगारवाढ देतानाही फार कसरत करावी लागणार असल्याचे सरपंच साळवी यांचे म्हणणे आहे तर कामगार नेते जीवन सुरुडे यांच्या मते कोरोनामुळे वसुली झाली नाही याचे निमित्त पुढे करुन कामगारांना पगारवाढ केलेली नाही महागाई भरमसाठ वाढल्यामुळे किमान पंधराशे रुपये पगारवाढ देण्यात यावी आशी मागणी केली