माळवाडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ, उमेश लोंढे व कर्मचाऱ्यांचा ग्रामस्थाकून सत्कार,

माळवाडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ, उमेश लोंढे व कर्मचाऱ्यांचा ग्रामस्थाकून सत्कार,
टाकळीभान प्रतिनिधी- श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ, उन्मेश लोंढे व कर्मचाऱ्यांनी महिला डिलिव्हरीचे सिजर न करता नॉर्मल डिलिव्हरी केल्याबद्दल, साळवे कुटुंब व नागरिकांकडून डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा सत्कार
माळवाडगाव येथील सौ साळवे यांची प्रसूती ची तारीख १७ मार्च होती . गरोदर पणाचे दिवस भरले तरी प्रसूती झाली नाही. खाजगी रुग्णालयात सिझर करण्याचा सल्ला देण्यात आला.डॉ लोंढे यांनी रोज प्राथमिक आरोग्य केंद्र माळवाडगाव येथे रुग्ण तपासणी केली व शुक्रवारी सौ साळवे यांची नॉर्मल प्रसूती प्राथमिक आरोग्य केंद्र माळवाडगाव येथे करण्यात आली. नवजात बालकाचे वजन ३.४ किलो होते.
या चांगल्या कामगिरीमुळे मंगेश साळवे व उपसरपंच शाम आसने, बाळासाहेब लटमाळे, रमेश मोरे व इतर नातेवाईक यांनी डॉ उन्मेष लोंढे, डॉ पांडुरंग जाधव, पटारे सिस्टर , त्रिभुवन सिस्टर, अकोलकर सिस्टर, खाजेकर फेटे बांधून हर श्रीफळ मिठाई देऊन सत्कार करण्यात आला,