अपघातब्रेकिंगमहाराष्ट्र
भोकरमध्ये भिल्ल समाजाच्या महिलेच्या प्रेताची हेळसांड.. ग्रामपंचायतीसमोर अत्यविधीसाठी खड्डा परंतु पोलीस, महसुल,व ग्रामपंचायत यांच्या मध्यस्तीने पर्यायी जागेत तणावपुर्ण वातावरणात अंत्यवीधी..
भोकरमध्ये भिल्ल समाजाच्या महिलेच्या प्रेताची हेळसांड..
ग्रामपंचायतीसमोर अत्यविधीसाठी खड्डा परंतु पोलीस, महसुल,व ग्रामपंचायत यांच्या मध्यस्तीने पर्यायी जागेत तणावपुर्ण वातावरणात अंत्यवीधी..
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे स्मशानभुमीसाठी आदिवासी भिल्ल समाजाचा प्रश्न उपस्थीत असतांना भिल्ल समाजाच्या महिलेला मृत्यु झाला व स्मशानभुमी नसलेल्या भिल्ल समाजाने ग्रामपंचातीच्या दारात खड्डा खांदुन अंत्याविधीचा निर्णय घेतल्याने पोलीस प्रशासन व महसुल प्रशासन घटनास्थळी दाखल झाले व मध्यस्ती करत पर्यायी जागेवर तणावपुर्ण वातावरणात अंत्यवीधी करण्यात आला.
याबाबत सविस्थर माहिती अशी की गेल्या अनेक दिवसापासून स्मशानभूमीसाठी आदिवासी भिल्ल समाजाचा संघर्ष सुरू असून हक्काची स्मशानभूमी मिळत नसल्याने भिल्ल समाजाच्या महिलेचा मृत्यू झाल्यामुळे दफनविधी करण्यासाठी जागा नाही म्हणून आदिवासी भिल्ल समाज संतप्त संतप्त होऊन ग्रामपंचायत पुढे दफनविधी करण्याचा निर्णय घेतला व खड्डा ही खांदला व दफनविधी ग्रामपंचायत समोर करण्याचा निर्णय घेतला यावेळी श्रीरामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, अतुल बोरसें, तलाठी अशोक चितळकर, सर्कल प्रशांत, विस्तार अधिकारी विजय चराटे, ग्रामविकास अधिकारी प्रदीप ढुमणे, उपसरपंच महेश पटारे यांनी आदिवासी समाजाच्या तरुणांशी विचार विनीमय करत पर्यायी जागा देत दफनविधी पर्यायी जागेवर करावा असा तोडगा काढल्याने ग्रामपंचायत समोर होणारा अंत्यविधी स्थगित करून पर्यायी जागेवर हा दफनविधी तणावपूर्ण वातावरणात करण्यात आला.
यावेळी पो.निरीक्षक दशरथ चौधरी,पो उप निरीक्षक अतुल बोरसे,पो निरीक्षक संपत निकम, यांनी तणावपुर्ण वातावरणात चोख बंदोबस्त ठेवला.
यावेळी भोकर एकलव्य संघटनेचे अध्यक्ष राजु लोखंडे,संघटक सर्जेराव आहेर, प्रकाशआहेर, दिगंबर मोरे, सौ सुनिता आहेर,नंदू माळी, लहाणू मोरे,बाळु आहेर, बंडू आहेर यांचेसह भिल्ल समाज बांधव, महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.
4/5 - (1 vote)