विकृतीचा कळस! मित्र बायकोवर करत होता बलात्कार अन् पती देत राहिला खडा पहारा

-
विकृतीचा कळस! मित्र बायकोवर करत होता बलात्कार अन् पती देत राहिला खडा पहारा
सध्या अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. विविध कारणांमुळे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे. अशीच एक अतिशय धक्कादायक घटना हिंगोली मधून समोर आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील सवड याठिकाणी सख्ख्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे.
खळबळजनक! सलमान खानच्या फार्म हाऊसमध्ये पुरले जातात कलाकारांचे मृतदेह? वाचा सविस्तर
सवड येथील एका तरुणाने आपल्या पत्नीवर मित्राला बलात्कार करायला लावला आहे. पीडित महिला घरी एकटी असल्याचं पाहून आरोपी पती मित्राला घरी घेऊन आला होता. यावेळी त्याने आपल्या मित्राला घरात पाठवून पत्नीवर बलात्कार घडवून आणला. या प्रकरणी पीडित महिलेनं हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी पतीसह त्याच्या मित्राविरोधात बलात्कारासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास पीडित महिला घरी एकटीच होती. यावेळी आरोपी पती आपला मित्र माधव जोगदंड याला घरी घेऊन आला होता. यावेळी आरोपी पती घराबाहेर थांबून मित्राला घरात पाठवून स्वत:च्या पत्नीवर बलात्कार घडवून आणला आहे. यावेळी विकृत पती घराबाहेर उभा राहून पहारा देत होता.
नराधम मित्राने देखील मैत्रीला काळिमा फासत मित्राच्या पत्नीला आणि तिच्या मुलीला चाकुचा धाक दाखवून जबरी अत्याचार केला आहे. या धक्कादायक घडल्यानंतर पीडित महिलेनं हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी पीडित महिलेच्या पतीसह त्याच्या मित्राविरोधात बलात्कारासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कुणालाही अटक केली नाही. या घटनेचा सविस्तर तपास हिंगोली ग्रामीण पोलीस करत आहेत.