कृषीवार्तादेश-विदेशनोकरीब्रेकिंगमहाराष्ट्रसंपादकीय

साई आदर्श ने आदर्श जपला… महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज…

साई आदर्श ने आदर्श जपला… महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज…

 

टाकळीभान: साई आदर्श पतसंस्थेने आदर्श जपला असून जनसामान्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचे मोठे काम या पतसंस्थेने केले असल्याचे प्रतिपादन टाकळीभान आदर्श मल्टीस्टेट शाखेच्या उद्घाटन प्रसंगी सरलाबेटाचे मठाधिपती गुरुवर्य महंत रामगिरी महाराज यांनी केले.

     यावेळी महाराज म्हणाले या पतसंस्थेने निस्वार्थ सेवा भाव ठेवून ही पतसंस्था लोकांच्या सामाजिक जीवनामध्ये ही सहभागी होत असल्याने संस्थेचे कौतुक त्यांनी केले. पतसंस्थेच्या पारदर्शी (sacsesful) यशस्वी कारभारामुळे १८ शाखा पतसंस्थेच्या झाल्या असून उत्तरोत्तर पतसंस्थेची प्रगती होत आहे. ही या पतसंस्थेच्या दृष्टीने भूषणावह बाब आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश वाबळे म्हणाले की आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे हे आमच्या पतसंस्थेच्या फेडरेशनचे सदस्य असून पतसंस्थेच्या आधुनिकीकरण, व नियमावलीमध्ये पतसंस्थांच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक ते बदल आम्ही वेळोवेळी करत असून आम्ही फक्त या पतसंस्थांचे रखवालदार आहोत, तसेच हे पतसंस्थेचे कार्य करत असताना राजकीय जोडे बाजूला ठेवून आम्ही हे कार्य करत आहोत त्यामुळे या पतसंस्थांचे कार्य चांगल्या प्रकारे सुरू आहे. त्याचप्रमाणे आमच्या पतसंस्थांनी कोरोना काळामध्ये पतसंस्था उघड्या ठेवून लोकांना दवाखान्याच्या खर्चासाठी, गरज ओळखून तातडीने मदत ही केल्या आहेत. आमचा पतसंस्थेच्या फेडरेशनने केंद्राच्या व शासनाच्या नियमावलीने पतसंस्थांच्या ठेवी सुरक्षित करण्याच्या हेतूने पतसंस्थांनी निर्णय घेतला असून, ग्राहकांच्या हिताला व विश्वासाला प्राधान्य देण्याचे ठरवले असून ग्रामीण अर्थकारणाला छोट्या-मोठ्या उद्योग व्यवसायिकांना आमचा पतसंस्था संजीवनी ठरताहेत. असे ते म्हणाले. आपल्या प्रास्ताविक भाषणामध्ये शिवाजीराव कपाळे म्हणाले की नऊ वर्षांपूर्वी आपण टाकळीभान मार्केट कमिटी या ठिकाणी या शाखेची स्थापना केली होती, ग्राहकांचा विश्वास प्रेम या जोरावर येथील शाखेने गरुड झेप घेतली असून मोठी उलाढाल या शाखेत होत आहे ह्या शाखेचे दृष्टीने अतिशय चांगली बाब आहे. येथील छोटे-मोठे उद्योग व्यवसायिक यांना उभारी देण्याचे काम येथील शाखेने केले आहे. आता या ठिकाणी अप्पासाहेब पटारे पाटील व्यापारी संकुल याठिकाणी पत संस्थेच्या स्व मालकीच्या ठिकाणी स्थलांतर झाले असून ग्राहकांना अधिकाधिक उत्तम सेवा, सुविधा देण्यासाठी सर्व आदर्श मल्टीस्टेटची टीम कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. यावेळी नवाज शेख यांनीही साई आदर्श मल्टीस्टेटच्या वाटचालीचा गौरव करून ही पतसंस्था सामाजिक बांधिलकी जपून समाज उपक्रमांमध्ये हिरारीने भाग घेऊन मदत करते व या पतसंस्थेच्या चांगल्या, पारदर्शी ,यशस्वी कारभारामुळे पतसंस्थेने स्व. मालकीच्या जागेवर व्यवसाय सुरू केला आहे, त्याबद्दल साई आदर्श मल्टीस्टेटचे व्यवस्थापन मंडळ, व सर्व टीमचे कौतुक करून अभिनंदन केले.यावेळी मा. सभापती नानासाहेब पवार, मा. सभापती डॉ. सौ. वंदनाताई मुरकुटे, मा. सरपंच मंजाबापू थोरात आदींनी शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त केले. या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ह-भ-प दत्तात्रय बहिरट महाराज, ह-भ-प मधु महाराज, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे,अशोकचे मा.चेअरमन ज्ञानदेव साळुंके, माजी संचालक दत्तात्रय नाईक, अशोक चे संचालक आप्पा यशवंत रणनवरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दादासाहेब कोकणे, उपसरपंच कान्हा खंडागळे, सेवा संस्थेचे माजी चेअरमन राहुल पटारे, मा. उपसरपंच राजेंद्र कोकणे, पोपटराव पटारे, किशोर पटारे, ग्राम. सदस्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मयूर पटारे, प्रा.जयकर मगर, किशोर थोरात,आबासाहेब रणनवरे, विलास पाटील, किशोरराव शिंदे पवन काठेड , बहिरूसिंग परदेशी, सुभाष जगताप, प्रसाद कोकणे, पांडुरंग पटारे, गणेश कोकणे, विलास सपकळ ,पांडुरंग मगर, तराळ सर, किशोर गाढे, बापू शिंदे,विष्णू गीते, धीरज कपाळे, मॅनेजर सचिन खडके, साई आदर्श मल्टी टेस्ट पतसंस्थेचा सर्व स्टाफ, दैनिक ठेव प्रतिनिधी नानासाहेब बोडखे,आदींसह साई आदर्श मल्टीस्टेटचे ग्राहक, व्यापारी मान्यवर विविध संस्थांचे पदाधिकारी, टाकळीभान व परिसरातील गावामधील सरपंच, उपसरपंच पदाधिकारी, पत्रकार व ग्रामस्थ उद्घाटन प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष मते यांनी केले

 

Rate this post
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे