सोनई आठवडे बाजारात मोबाईल चोरांची एंट्री अनेक मोबाईल चोरीला.
एपीआय माणिक चौधरी यांच्यापुढे आव्हान, अनेक गुन्ह्याचा तपास प्रलंबित

सोनई आठवडे बाजारात मोबाईल चोरांची एंट्री अनेक मोबाईल चोरीला.
. एपीआय माणिक चौधरी यांच्यापुढे आव्हान, अनेक गुन्ह्याचा तपास प्रलंबित
सोनंई, गेल्या काही दिवसांपासून थडावलेली आठवडे बाजारात चोरीच्या घटनेत ऐ पी आय माणिक चौधरी साहेब आल्यापासून गाडी चोरी व आठवडे बाजारातील मोबाईल चोरी यांच्यात वाढ झाल्याने पुन्हा चोरांनी डोक वर काढल्याचे दिसत आहे रविवार हा दिवस आठवडी बाजार असून वाड्या-वस्त्याचे लोक आठवडी बाजार करण्यासाठी येतात दिवस वाड्या वस्त्या वरुन लोक बाजारात येत असतात रविवार दि ५रोजी बाजारातुन तीन ते चार मोबाईलची चोरीच्या घटना घडल्या आहेत नव्याने सोनई पोलीस ठाण्यात बदलुन आलेले सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या समोर या मोबाईल चोरांनी आव्हान दिले आहे आता याचा सामना कशा पध्दतीने करतात या आधी सुध्दा मोबाईल चोरीच्या घटना घडल्या आहेत त्यांचा तपास अद्याप पर्यत लागलेला नसतांना पुन्हा चोरीच्या घटना घडू लागलयिने आश्चर्य व्यक्त केले जात आहे पोलीसांनी अशा मोबाईल चोरांना अटक करून कारवाई करावी अशी मागणी चोरी गेलेल्या मोबाईल पीडिताने केली आहे